Rishabh Pant : रिषभ पंत अन् रिंकू सिंगचं अमेरिका ते चेन्नई कनेक्शन, केकेआरच्या विजयानंतर थेट व्हिडीओ कॉल
Rinku Singh : कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानंतर टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या रिषभ पंतनं रिंकू सिंगला व्हिडीओ कॉल केला.
चेन्नई :कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या अंतिम फेरीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) पराभूत केलं. केकेआरनं हैदराबादवर 8 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. केकेआरच्या विजयानंतर टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतनं (Rishabh Pant) थेट रिंकू सिंगला (Rinku Singh) व्हिडीओ कॉल करुन शुभेच्छा दिल्या. रिषभ पंत सध्या अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कपसाठी दाखल झाला आहे.
रिषभ पंतच्या रिंकू सिंगला शुभेच्छा
कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 च्या लढतीत सनरायजर्स हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला पहिल्यांदा 113 धावांवर रोखलं यानंतर रहमानुल्लाह गुरबाझ आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. आयपीएलची ट्रॉफी तिसऱ्यांदा पटकावल्यानंतर केकेआरनं जल्लोष केला. केकेआरचा संघमालक शाहरुख खान देखील यामध्ये सहभागी झाला होता. केकेआरच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान रिंकू सिंग आणि रिषभ पंतची व्हिडीओ कॉलवरुन चर्चा झाली. रिषभ पंतनं रिंकू सिंगला केकेआरच्या विजयाबद्दल सदिच्छा दिल्या.
पाहा व्हिडीओ
TATA IPL 2024 Trophy ✅
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 27, 2024
Time for a 'Rishu Bhaiya-Rinku' reunion in the USA! ✈️ pic.twitter.com/d1jPyqkXqH
भैय्या, आय एम कमिंग : रिंकू सिंग
1 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. रिषभ पंतनं भीषण अपघातातील दुखापतीनंतर आयपीएलमधून कमबॅक केलं. आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर रिषभ पंतला टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात संधी देण्यात आली. तर, दुसरीकडे यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरच्या टॉप ऑर्डरनं दमदार केल्यानं रिंकू सिंगला बॅटिंगची फारशी संधी मिळाली नाही. केकेआरकडून 2023 चं आयपीएल गाजवणाऱ्या रिंकू सिंगला यंदा चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं रिंकू सिंगला टी-20 वर्ल्ड कपमध्ये 15 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही. रिंकू सिंगचा समावेश राखीव खेळाडू म्हणून करण्यात आला आहे. टीम इंडियाची पहिली बॅच 25 मे रोजी अमेरिकेला रवाना झाली आहे. तर, राहिलेले खेळाडू नंतर टीम इंडियाला जॉईन होणार आहेत. त्यानुसार रिंकू सिंगनं रिषभ पंत सोबत व्हिडीओ कॉलवर चर्चा करताना 28 तारखेला अमेरिकेत पोहोचत असल्याचं म्हटलं.
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकणार?
भारतानं 2007 चा टी-20 वर्ल्ड कप पाकिस्तानला पराभूत करत जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. यंदा भारताकडे टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर भारत 5 जून रोजी आयरलँड यांच्यात लढत होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला लढत होणार आहे. यानंतर भारत आणि अमेरिका, भारत आणि कॅनडा असे सामने असतील.
संबंधित बातम्या :
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर