IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर
IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान अंबाती रायडू समालोचन करताना दिसला. समालोचन करताना अंबाती रायडूने विराट कोहली आणि आरसीबीवर टीका केल्याचं अनेकदा दिसले.
IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान अंबाती रायडू समालोचन करताना दिसला. समालोचन करताना अंबाती रायडूने विराट कोहली आणि आरसीबीवर टीका केल्याचं अनेकदा दिसले. आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीने ऑरेंज कॅपवर नाव कोरले. त्याने 15 सामन्यात 741 धावांचा पाऊस पाडलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 583 धावा केल्या, तो विराट कोहलीच्या आसपासही राहिला नाही. यावरुनच रायडूने विराट कोहलीला टार्गेट केले. रायडूने विराट कोहलीच्या ऑरेंज कॅपचा काय फायदा, असं म्हणत टीका केली. त्याला इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानं झणझणीत उत्तर दिले. त्याशिवाय रायडूला जोकर असा टोलाही लगावला. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
लाईव्ह टिव्हीवर रायडूची झाली फजिती
मॅथ्यू हेडन, केविन पीटरसन, अंबाती रायडू आणि मयंती लँगर हे विराट कोहलीच्या आयपीएलमधील कामगिरीवर चर्चा करत होते. चर्चेदरम्यान रायडूने विराट कोहलीच्या फलंदाजीवर टीका केली. रायडू म्हणाला की, "स्पर्धेदरम्यान विराट कोहलीसारख्या महान खेळाडूंची बरोबरी करणं भल्या भल्या फलंदाजांना शक्य होत नाही. विराट कोहलीने नेहमीच आपल्या संघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. "
रायडूला मध्येच थांबवत पीटरसन म्हणाला की," हे युवा खेळाडूंसाठी चांगलेय. कारण, त्यांना चांगला खेळ करण्यासाठी प्रेरणा मिळेल. " यावर रायडूने केलेले वक्तव्याची चर्चा होतेय. रायडू म्हणाला की, "विराट कोहलीच्या इतक्या मोठ्या स्टँडर्डमुळे युवा खेळाडू दबावात जातात. त्यांना विराट कोहलीसारखा खेळ करण्याचा दबाव राहतो."
ही चर्चा सुरु असतानाच मयंती लँगर हिनेही यामध्ये भाग घेतला. मयंती म्हणाली की, "रजत पाटीदार याने चांगला खेळ करुन दाखवलाय. त्यानं आपली लेवल वाढवली आहे. "
त्यावर रायडू म्हणाला की, पाटीदार हा पाटीदारच राहणार आहे. तो विराट कोहली कधीच होमार नाही. विराट कोहलीला आपल्या खेळाडू लेव्हल थोडी कमी करण्याची गरज आहे. इतर खेळाडूंना आपली कामगिरी चोख बजावता येईल.
पाहा व्हिडीओ---
No way Kevin Pietersen called Ambati Rayudu a Joker on live TV.#IPLFinal pic.twitter.com/LYigudOhig
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) May 27, 2024
केविन पीटरसनने रायडू म्हटले 'जोकर'
अंबाती रायडू याच्या वक्तव्याबाबत केविन पीटरसनच्या चेहऱ्यावर मतभेद स्पष्टपणे दिसून येत होते. मयंती लँगर म्हणाली की, "अंतिम सामन्यापूर्वी रायुडूने ऑरेंज जर्सी घातली होती, परंतु केकेआर चॅम्पियन झाल्यानंतर त्याने जांभळ्या रंगाचा कोट घातला आहे." मग काय पीटरसन आणि हेडनने रायडूवर आगपखड केली.दोघांनी रायडूला काहीही बोलण्याची संधीही मिळाली नाही. पण या चर्चेचा सर्वात वादग्रस्त क्षण तो होता जेव्हा पीटरसनने रायडूला 'जोकर' म्हटले.