आरसीबी-गुजरात सामन्यात पावसाचा व्यत्यय, नाणेफेक उशीराने; सामना रद्द झाल्यास मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार
RCB vs GT Live Score IPL 2023 : बंगलोरमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामना उशीराने सुरुवात होणार आहे.
RCB vs GT Live Score IPL 2023: बंगलोरमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामना उशीराने सुरुवात होणार आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला सामना जिंकणे अनिवार्य आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास मुंबईचा थेट प्लेऑफमध्ये प्रवेश होईल. शनिवार आणि रविवारी दोन दिवस बेंगलोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजता पावसाने विश्रांती घेतली होती.. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे नाणेफेक उशीराने होणार आहे.
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष लागलेय. कारण, पावसामुळे हा सामना रद्द झाला अन् मुंबईने हैदराबादचा पराभव केला... तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पात्र करेल. हैदराबादविरोधात मुंबईचा संघ विजय मिळवू शकेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबई राजस्थानचे आव्हान संपुष्टात आलेय. आता आरसीबी आणि मुंबई यांच्यापैकी एक संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. आरसीबीचा रनरेट चांगलाय.. पण मुंबईच्या मदतीला पाऊस धावून आल्याचे चित्र आहे. बंगोलर आणि गुजरात यांच्यातील सामना रद्द झाल्यास मुंबईचा संघ पात्र ठरणार..
Toss has been delayed at the Chinnaswamy Stadium due to rain. pic.twitter.com/hNr9AzkT72
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
It's still raining at Chinnaswamy Stadium! 🌧️
— OneCricket (@OneCricketApp) May 21, 2023
Toss has been delayed.#IPL2023 #bengalururain #chinnaswamy pic.twitter.com/Z62VKBaGoa
GOOD NEWS :
— Dr. Cric Point (@drcricpoint) May 21, 2023
Rain has almost stopped at #Chinnaswamy, Super soppers are set to start the work.
We may get some good news soon, if there will be no further rain. #RCBvGT #RCBvsGT pic.twitter.com/AHA2yKgbex
LIVE CHINNASWAMY....
— Cricket Guruji (@CricketGuruji6) May 21, 2023
📌 Light Drizzle ... Expected to Stop by 7:30 ..
📌 No rains expected after 7:30 .#chinnaswamy#bengalururain #MIvSRH #RCBvGT #BengaluruWeather pic.twitter.com/Ri8Oxi95M0
Heavy rain in Bangalore⛈️#chinnaswamy #RCBvsGT pic.twitter.com/BeZD9fskiz
— Maaaahi✨ (@maahievans) May 21, 2023
Rain stopped at #chinnaswamy
— Abhinav Tiwari (@abhinav5678901) May 21, 2023
❤️ pic.twitter.com/w9KIf1tPkm
Update - Good news.The rain has stopped and the groundstaff is in the middle, taking the covers of#GTvsRCB #IPLPlayOffs #IPL2O23 #MIvSRH #RCBvGT #MSDhoni #bengalururains #jadeja #Chinnaswamy #MumbaiIndians #Mayank #Vivrant #BCCI #SRHvsMI #MIvsSRH #Wankhede #Akashmadhwal #Bumrah pic.twitter.com/Jk0XJWQOqu
— Sumit Mukherjee (@Who_Sumit) May 21, 2023
Rain stopped.
— Vishnu Vishal Reddy (@Vishal767082) May 21, 2023
Covers are taking off in Chinnaswamy.#RCBvGT #chinnaswamy #ViratKohli𓃵 #bengalururain #MIvSRH #IPLPlayOffs #CricketTwitter pic.twitter.com/KvSGh38JC9
Mi fans: Vitradhaaaaa…#chinnaswamy https://t.co/uCO7CuH6cS
— Mano🐾 (@Manobala99) May 21, 2023
बंगळुरु संघासाठी प्लेऑफचं समीकरण काय?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी प्लेऑफच्या समीकरण जाणून घ्या. सध्या 13 सामन्यांतून सात विजयांसह आरसीबी संघाकडे 14 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला त्यांचा गुजरात विरोधातील शेवटचा साखळी सामना जिंकून 16 गुण मिळवावे लागतील. शिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव व्हावा किंवा मुंबईला कमी फरकाने विजय मिळावा, अशी इच्छा बाळगावी लागेल. यामुळे स्थितीत आरसीबीला 16 गुण मिळतील आणि त्याचा नेट रन रेटही मुंबईपेक्षा चांगला असेल. असे झाल्यास आरसीबीला प्लेऑफचं तिकीट मिळेल. पण सध्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
बंगळुरु विरुद्ध गुजरात सामना
आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील शेवटचा 70 वा लीग सामना आज बंगळुरु आणि गुजरात (GT vs RCB) या दोन संघात रंगणार आहे. 21 मे रोजी बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरात संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला आजचा सामना जिंकणं फार गरजेचं आहे.