एक्स्प्लोर

IPL 2024 : ट्रोल करणाऱ्यांना प्रितीचं सडेतोड उत्तर, शशांकसाठी खास पोस्ट, लिलावातील चुकीबद्दलही दिलं स्पष्टीकरण!

IPL Preity Zinta : शशांक सिंह याच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर पंजाब संघाला आणि शशांक सिंह याला ट्रोल करण्यात आले. शशांक सिंह याला चुकून घेण्यात आलं, असा टोला नेटकऱ्यांकडून लगावण्यात आला.

IPL Preity Zinta : पंजाब आणि गुजरात यांच्यातील सामन्यादरम्यान शशांक सिंह आणि आशुतोष यांनी वादळी खेळी केली. गुजरातने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शशांक सिंह यानं शानदार अर्धशतक ठोकत पंजाबला सहज विजय मिळवून दिला. एकवेळ पंजाब सामना गमावणार असेच वाटत होतं, पण शशांक सिंह यानं जिद्द सोडली नाही. दिग्गज फलंदाज माघारी परतल्यानंतरही शशांक सिंह यानं एकट्यानं लढा दिला. शशांक सिंह याच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर पंजाब संघाला आणि शशांक सिंह याला ट्रोल करण्यात आले. शशांक सिंह याला चुकून घेण्यात आलं, असा टोला नेटकऱ्यांकडून लगावण्यात आला. याच ट्रोलर्सला प्रिती झिंटानं प्रत्युत्तर देत तोंड गप्प केले आहे.  शशांक सिंह याच्या सपोर्टमध्ये प्रिती झिंटा यानं एक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

प्रिती झिंटाने एक्स (ट्वीटर) खात्यावरुन शशांकसाठी शुक्रवारी खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये प्रिती झिंटा म्हणते की, आयपीएल लिलावात आमच्याबद्दल जे काही बोललं जात होतं, त्याबद्दल बोलण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला वाटतेय. शशांक याला चुकून खरेदी केले.. असं ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी अनेकांचा आत्मविश्वास गमावलेला असतो. दबावाखाली जातात, किंवा निराश होतात. पण शशांकने त्यावर मात केली. तो इतरांसारखा नाही. तो खरोखरच खूप खास आहे. फक्त एक खेळाडू आणि कौशल्यामुळे नाही तर त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे. शशांकने त्याच्यावरील टीका-टिप्पण्या, ट्रोलिंग, आरोप, विनोद या सर्वांना सहजपणं घेतलं. तो बळीचा बकरा झाला नाही. त्यानं स्वत:वर विश्वास दाखवला. 

आपल्या पोस्टमध्ये पुढे प्रिती झिंटा म्हणते की, "शशांक सिंह यानं स्वत:चं समर्थन केलेच, त्याशिवाय मेहनतही करत सर्वांच आपल्या प्रतिभेची चूणूक दाखवली. त्यामुळेच मी त्याचं कौतुक करत आहे. शंशाक याच्या खेळीचं कौतुक करेल तितकं कमीच आहे. तो सन्मनाच्या पात्र आहे.  आयुष्य जेव्हा नव्या वळणावर जातं, तेव्हा तुमच्या स्क्रिप्टनुसार चालत नाही, हे सर्वांसाठी एक उदाहरणच आहे. कारण, लोक तुमच्याबाबात काय विचार करतात, ते महत्वाचं नाही. पण तुम्ही तुमच्याबाबत काय विचार करतात, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शशांकप्रमाणेच स्वत:वर विश्वास करणं बंद करु नये. शशांक आयुष्याच्या खेळात तू नक्कीच सामनावीर होशील, अशी मला आशा आहे. "

पाहा प्रिती झिंटाची पोस्ट - 

दरम्यान, गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. एकवेळी पंजाबने सामना गमावला असेच सर्वांना वाटत होते. कारण, शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, जितेश शर्मा, सिकंदर रजा यासारखे दिग्गज बाद होऊन तंबूत परतले होते. पण नवख्या शशांकने जिद्द सोडली नाही. शशांकने अखेरपर्यंत लढत पंजाबला विजय मिळवून दिला. शशांकने 29 चेंडूमध्ये नाबाद 61 धावांची खेळी केली. 

आणखी वाचा :

IPL 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाला घाबरायचो, चेन्नईच्या प्रशिक्षकच्या वक्तव्यानं खळबळ

IPL Points Table : चेन्नईच्या पराभवाचा फटका गुजरात-पंजाबला, गुणतालिकेत झाला मोठा बदल

IPL 2024: शाहरुखला विचारा मला रिटेन का नाही केलं? शुभमन गिल असं का म्हणाला...

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget