IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण
पंजाब किंग्स (Punjab Kings) या टीमची को-ओनर प्रीती झिंटा (Priety Zinta) ही लिलावात गैरहजर असणार आहे.
![IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण preity zinta ipl mega auction 2022 punjab kings co owner will Absent in auction IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/12/11af1e9afe67fbba21d97d8166107b87_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Auction Preity Zinta : 2022 च्या आयपीएल (IPL) रणसंग्रामासाठीची लिलाव प्रक्रिया आज पार पडणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरु येथे ही खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात अनेक मोठे खेळाडू सामील आहेत. यामध्ये कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) या टीमची को-ओनर प्रीती झिंटा (Priety Zinta) ही गैरहजर असणार आहे. याबद्दल प्रीतीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली.
प्रीती झिंटानं ट्वीट शेअर करून सांगितले की, 'यावर्षी मी आयपीएल लिलावात सामिल होऊ शकत नाही कारण मी सध्या माझ्या लहान मुलांना घेऊन भारतात येऊ शकत नाहिये. गेली काही दिवस मी लिलावल संबंधित चर्चा आणि खेळाबद्दल चर्चा करण्यात व्यस्त होते. मला आमच्या टीमच्या चाहत्यांना विचारायचं आहे की त्यांना या टीममध्ये कोणते नवे खेळाडू पाहायचे आहेत. '
View this post on Instagram
2016 मध्ये प्रीतीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रीतीने जुळ्यांना जन्म दिला असून तिने मुलांची नावं सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली होती. जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी प्रीतीच्या मुलांची नावं आहेत.
प्रीतीची पोस्ट
प्रीतीने सोशल मीडियावर पती जीन गुडइनफसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोला प्रीतीने कॅप्शन दिले, 'सर्वांना नमस्कार, मला तुमच्या सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करत आहोत.'
हे देखील वाचा-
- IPL auction 2022 : हर्षल पटेल ते मोहम्मद शमी, 'या' वेगवान भारतीय गोलंदाजांना करारबद्ध करण्यासाठी संघ उत्सुक
- IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात कोणावर लागणार सर्वात जास्त बोली, ख्रिस मॉरिसचे रेकॉर्ड मोडीत निघणार का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)