एक्स्प्लोर

PBKS vs SRH, Top 10 Key Points : हैदराबादचा पंजाबवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

आयपीएलमधील आजच्या 28 व्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) सामन्यात हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला.

PBKS vs SRH, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला आहे. आधी हैदराबादने उत्तम गोलंदाजीच्या जोरावर 151 धावांत पंजाबला रोखलं. ज्यानंतर मार्करम आणि पूरन यांच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर त्यांनी 18.5 षटकात 152 धावांचे लक्ष्य पार करत सात विकेट्सनी विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा विजय असल्याने ते गुणतालिकेतही चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

PBKS vs SRH 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. त्यानुसार आज देखील हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आणि त्यानंतर सामनाही जिंकला. 
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात हैदराबादच्या संपूर्ण संघाने एका उत्तम खेळीचे दर्शन घडवले. त्यांनी आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर उत्तम फलंदाजीच्या जोरावर सामना खिशात घातला.
  3. पंजाबला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. पण दुखापतीमुळे त्यांचा कर्णधार मयांक नसल्याने याचा फटका त्यांना बसला. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले
  4. पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी करु शकल्याने पंजाबने 151 धावा केल्या. लियामने दमदार खेळी करत 60 धावांची महत्तपूर्ण खेळी केली.
  5. दुसरीकडे हैदराबादची गोलंदाजी पाहता त्यांच्या उम्रान मलिकने आज कमालच केली. अखेरच्या षटकात हैदराबादचा उम्रानने दमदार अशा तीन विकेट्स घेतल्या. तर एक खेळाडू धावचीत झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात एकही धाव न जाता पंजाबचे चार गडी शून्यावर माघारी परतले. 
  6. ज्यानंतरक 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची पहिली विकेट कर्णधार विल्यमसनच्या (3) रुपात स्वस्तात गेली. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्मा यांनी एक चांगली भागिदारी रचली.
  7. हे दोघेही बाद झाल्यावर मात्र निकोलस पूरन आणि अॅडन मार्करम यांनी अभेद्य अशी नाबाद भागिदारी रचत 152 धावांचे आव्हान 18.5 षटकात पार केले.
  8. यावेळी पूरनने नाबाद 35 आणि मार्करमने नाबाद 41 रन ठोकले.
  9. पंजाबकडून राहुल चाहरने दोन तर रबाडाने एक विकेट घेतली.
  10. या विजयासह हैदराबादने गुणतालिके थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

 हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यूEknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवलाMaharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषदेचं गणित काय? मतांचा कोटा, कुणाला घाटा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget