एक्स्प्लोर

IPL 2023, PBKS vs KKR : कोलकाता आतापर्यंत पंजाबवर वरचढ, यंदाही नाईट रायडर्सचा रेकॉर्ड कायम राहणार?

Kolkata Knight Riders vs Punjab Kings : पंजाब आणि कोलकाता यांच्यात आज सामना रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाताच्या संघाने पंजाबवर वरचढ ठरला आहे.

KKR vs PBKS, IPL 2023 : आयपीएलच्या (IPL 2023) यंदाच्या हंगामातील दुसरा रणसंग्राम कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात आज शनिवारी (1 एप्रिल) रोजी रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कोलकाता संघाने पंजाबवर वर्चस्व राखलं आहे. मोहालीतील आयएस ब्रिंदा स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. पंजाब किंग्स शिखर धवनच्या तर कोलकाला नाईट रायडर्स नितीश राणाच्या नेतृत्वात लढतीसाठी उतरणार आहे. 

IPL 2023, PBKS vs KKR : पंजाब आणि कोलकाता यांच्यात सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या तीन हंगामात, हे दोन्ही संघ एकमेकांना आळीपाळीने पराभूत करत विजय मिळवत आले आहेत. पण एकंदरी रेकॉर्ड पाहता कोलकाता नाईट रायडर्स संघ पंजाब किंग्सवर वरचढ ठरला आहे. पंजाब आणि कोलकाता या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 20 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सला फक्त 10 सामने जिंकले आहेत. असं असलं, तरी यावेळी कोलकाता संघासाठी पंजाबवर वर्चस्व राखणं अवघड होणार आहे. कारण, कोलकाताचे दोन चांगले खेळाडू श्रेयस अय्यर आणि जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर आहेत.

IPL 2023, PBKS vs KKR : कोलकाताला श्रेयस अय्यरची उणीव भासेल

कोलकाता नाईट रायडर्स संघ त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो सामन्यातून बाहेर आहे. त्यांच्या जागी नितीश राणावर केकेआरची जबाबदारी आहे. संघाचं नेतृत्व करण्याची नितीश राणाची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे येथे कोलकाताला अनुभवाची कमतरता भासू शकते.

IPL 2023, PBKS vs KKR : पंजाबचं पारड जड

या सामन्याकडे पाहिलं तर, पंजाबचा संघ कोलकात्यापेक्षा मजबूत स्थितीत आहे. पंजाब किंग्सकडे गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची तगडी टीम आहे. तर दुसरीकडे, कोलकाता संघ यावेळीही आपल्या कॅरेबियन जोडी आंद्रे रसेल आणि सुनील नरेनवर अधिक अवलंबून असणार आहे.

संभाव्य प्लेईंग 11

कोलकाता नाईट रायडर्स : 

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज : 

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ऋषी धवन, सॅम कुरान, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KKR vs PBKS : दोन्ही संघांची कमान नव्या कॅप्टनच्या हाती; कशी असेल पंजाब आणि कोलकाताची प्लेईंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Embed widget