एक्स्प्लोर

KKR vs PBKS : धवन आणि नितीश या नव्या कर्णधारांमध्ये चुरशीची लढत; कशी असेल पंजाब आणि कोलकाताची प्लेईंग 11, जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2023, PBKS vs KKR : आज (1 एप्रिल) रोजी पंजाब आणि कोलकाता यांच्यात लढत पाहायला मिळणार असून दोन्ही संघांची कमान नव्या कर्णधाराच्या हाती असेल.

KKR vs PBKS Match Prediction : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील दुसरा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पाहायला मिळणार आहे. दुपारी 3.30 वाजता मोहालीतील पंजाब असोसिएशनच्या स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याचा अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान नितीश राणावर असेल. तसेच पंजाब किंग्स शिखर धवनच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे.

IPL 2023, PBKS vs KKR : पंजाब संघाची स्थिती

आयपीएल 2023 मध्ये मयंक अग्रवालच्या जागी यंदा शिखर धवनकडे पंजाब किंग्सचं कर्णधारपद आहे. शिखरच्या संघात अनेक दमदार खेळाडूंचा समावेश आहे. पंजाबच्या संघात भानुका राजपक्षे, सिकंदर रझा, सॅम करण आणि शाहरुख खानसारखे खेळाडू आहेत. हे सर्वजण चांगल्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांच्याशिवाय अर्शदीप आणि नॅथन एलिस यांनी गोलंदाजीमुळे संघाकडून चाहत्यांना अपेक्षा आहेत. 

IPL 2023, PBKS vs KKR : कोलकाता संघाची स्थिती

कोलकातासाठी अडचण म्हणजे श्रेयस अय्यरच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो सध्या या सामन्यातून बाहेर आहे. तसेच दुसरा दिग्गज फलंदाज जॉनी बेअरस्टो ही जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने तो आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. जॉनी बेअरस्टोच्या जागी पंजाबने 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसोबतच तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो.

कशी आहे खेळपट्टी?

मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे. येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात. येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चा वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला. 

संभाव्य प्लेईंग 11

कोलकाता नाईट रायडर्स : 

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज : 

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ऋषी धवन, सॅम कुरान, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' अॅपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

PBKS vs KKR Match Preview : कोलकाता विरुद्ध पंजाब मुकाबला, कोणाचं पारडं जड?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget