एक्स्प्लोर

Watch: WPLचा खिताब पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या पोरींचा जल्लोष; पाहा सेलिब्रेशनचा व्हिडीओ

Mumbai Indians Celebration: WPL च्या पहिल्या सीझनचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं. चॅम्पियन झाल्यानंतर या संघाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

Mumbai Indians Celebration: WPL च्या पहिलं जेतेपदाला मुंबई इंडियन्सनं  (Mumbai Indians) गवसणी घातली. रविवारी (26 मार्च) रात्री झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा तीन चेंडू राखून पराभव केला. पहिलंवहिलं जेतेपद पटकावल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. मुंबईचे खेळाडू मैदानावर उशिरापर्यंत जल्लोष करताना दिसले.  

अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं सर्वात आधी दिल्लीला केवळ 131 धावांवर रोखलं आणि त्यानंतर केवळ तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठलं अन् इतिहास रचला. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचं जेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं. फलंदाज सिव्हरनं विजयी चौकार ठोकताच मुंबईचे खेळाडू मैदानाच्या दिशेनं धावले. यावेळी आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बेब्रॉन स्टेडियमवर खेळाडूंसह चाहत्यांनीही मुंबईचा विजय साजरा केला. 

WPL चं पहिलं जेतेपद अन् जल्लोष 

सामन्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरला WPL ट्रॉफी सुपूर्द केली. त्यानंतर हरमनप्रीतनं सहकारी खेळाडूंसह ट्रॉफी उचावली. मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसोबत खूप फोटो काढले. यादरम्यान खेळाडूंनी संघाच्या प्रशिक्षक झुलन गोस्वामीसोबतही खूप मस्ती केली. त्यांच्या मस्तीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही अंतिम सामन्यासाठी उपस्थित 

मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही बेब्रॉन स्टेडियमवर उपस्थित होता. मुंबईनं विजय मिळवताच कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यासह संपूर्ण पुरुष संघानं उभं राहून टाळ्या वाजवून आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. महिला संघांचा विजय साजराही केला. 

मुंबईच्या पोरींनी मैदान मारलं 

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफिक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक दिल्लीला धक्के दिली. दिल्लीची अवस्था अतिशय बिकट झाली होती. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतले होते. अवघ्या 80 धावांत दिल्लीच्या 7 विकेट गेल्या होत्या. 87 धावांत दिल्लीचे नऊ फलंदाज माघारी परतले होते. पण शिखा पांडे आणि राधा यादव यांनी विस्फोटक फलंदाजी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दहाव्या विकेटसाठी दोघांनी चार धावा जोडल्या. शिखा पांडे 27 नाबाद राहिली तर राधा यादव हिनं 27 नाबाद 27 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार मेग लॅनिंग हिने 35 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकून इस्सी वोंग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर ए केर हिने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Indians WPL: कॅप्टन हरमनचं नेतृत्त्व, हेलीची ऑलराउंडर खेळी; 'या' पाच खेळाडूंमुळेच मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget