(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Indians WPL: कॅप्टन हरमनचं नेतृत्त्व, हेलीची ऑलराउंडर खेळी; 'या' पाच खेळाडूंमुळेच मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद
WPL 2023: WPLच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सनं धमाकेदार कामगिरी केली आहे. मात्र जेतेपदापर्यंतच्या या स्पर्धेत मुंबईच्या संघातील काही खेळाडूंची कामगिरी मात्र विशेष प्रभावी ठरली.
WPL 2023: हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करून महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) च्या पहिल्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. रविवारी (26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं 132 धावांचं लक्ष्य तीन चेंडू राखून पूर्ण केलं.
तसं पाहायला गेलं तर WPLच्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सनं धमाकेदार कामगिरी केली. मात्र जेतेपदापर्यंतच्या या स्पर्धेत मुंबईच्या संघातील काही खेळाडूंची कामगिरी मात्र विशेष प्रभावी ठरली. मुंबई इंडियन्सच्या त्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी संपूर्ण WPL च्या सीझनमध्ये तुफान खेळी करत विजेतेपद आपल्याकडे खेचून आणलं.
Unforgettable Occasion 🤝 Special Celebrations@mipaltan captain @ImHarmanpreet along with Bowling Coach & Mentor @JhulanG10 express their excitement on winning the inaugural edition of #TATAWPL 👏🏻👏🏻 - By @28anand
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 27, 2023
Full Interview 🎥🔽 #DCvMI | #Final https://t.co/QJS16wzXB1 pic.twitter.com/ozpiULRq4C
1. हेली मॅथ्यूज : कालच्या सामन्यात मुंबईनं दिमाखदार कामगिरी करत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. पण मुंबईच्या या विजयात सर्वात मोठी वाटेकरी आहे ती म्हणजे, हेली मॅथ्यूज. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजनं 10 सामन्यात 30.11 च्या सरासरीनं 271 धावा केल्यात, त्यात एका अर्धशतकी खेळीचाही समावेश आहे. हेली मॅथ्यूजनं गोलंदाजीतही संघाची कमान सांभाळली. 12.62 च्या सरासरीनं 16 विकेट्स घेतलेत. फायनल्समध्येही हेली मॅथ्यूजनं अवघ्या 5 धावांवर तीन खेळाडूंना बाद केलं. सोफी एक्लेस्टोननं देखील संपूर्ण स्पर्धेत सोळा विकेट घेतल्या, परंतु हेली मॅथ्यूजनं तिच्यापेक्षा चांगल्या सरासरीनं विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामुळे ती पर्पल कॅपची मानकरी ठरली. एवढंच नाही तर हेली मॅथ्यूजची मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू म्हणूनही निवड झाली आहे.
2. Nat Sciver-Brunt : इंग्लिश ऑलराउंडर Nat Sciver-Brunt हिनंही विजेतेपदापर्यंतच्या मुंबईच्या लढतीत मोठं योगदान दिलं. Bruntने 10 सामन्यांत 66.40 च्या सरासरीनं 332 धावा केल्यात. या सीझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती दुसऱ्या स्थानावर होती. नॅट सायव्हर-ब्रंटनं अंतिम सामन्यातही नाबाद 60 धावा केल्या. सिव्हर-ब्रंटनंही गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत 10 विकेट्स घेतल्यात.
3. एमिलिया केर : न्यूझीलंडच्या एमिलिया केरनं संपूर्ण हंगामात तिच्या संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. 22 वर्षीय एमिलिया केरनं केवळ 14.06 च्या सरासरीनं 15 विकेट घेतल्यात. केरनं 37.25 च्या सरासरीनं 149 धावा करत फलंदाजीतही आपल्या संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.
4. इस्सी वोंग : इंग्लंडच्या इस्सीनं यूपी वॉरियर्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात हॅटट्रिक घेतली. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात इस्सीनं पहिले तीन विकेट्स घेतले. 20 वर्षीय इस्सानं 10 सामन्यांत 14 च्या सरासरीनं 15 विकेट घेतल्या.
5. हरमनप्रीत कौर : मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनं तिच्या संघाचं नेतृत्व केलं. हरमनप्रीत कौरनं 40.41 च्या सरासरीनं 281 धावा केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हरमनप्रीत तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौरचं कर्णधारपद उत्कृष्ट होतं, तिच्या नेतृत्त्वात संघ संपूर्ण सीधनमध्ये चॅम्पियन्सप्रमाणे खेळला.
महिला प्रीमियर लीग 2023
- सर्वाधिक रन : मेग लॅनिंग (345)
- सर्वाधिक सरासरी : नेट सायव्हर-ब्रंट (66.4)
- सर्वाधिक स्ट्राइक रेट : शेफाली वर्मा (185.29)
- सर्वोत्कृष्ट स्कोअर : सोफी डिवाइन 99 रन vs गुजरात जायंट्स
- सर्वाधिक षटकार : शेफाली वर्मा (13), सोफी डिवाइन (13)
- सर्वाधिक विकेट्स : हेली मॅथ्यूज (16), सोफी एक्लेस्टोन (16)
- सर्वाधिक आकडे : मारिजाने कॅप (5/15) vs गुजरात जायंट्स
महत्त्वाच्या इतर बातम्या :