WPL 2023 : हरमनप्रीतची तुफान खेळी गुजरातवर भारी; WPL प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ 'मुंबई इंडियन्स'
WPL 2023: महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 सीझनमध्ये मुंबई इंडियन्स (MI) प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहला संघ बनली आहे.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) 2023 मध्ये सध्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ची धमाकेदार कामगिरी सुरुच आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी (14 मार्च) झालेल्या मुंबई इंडियन्सच्या पाचव्या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा (Gujarat Giants) 55 धावांनी पराभव केला.
या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur News) दमदार फलंदाजी केली. तिच्या झंझावाती अर्धशतकाने गुजरातचा संपूर्ण संघ गारद झाला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या होत्या.
हरमनप्रीतची 51 धावांची तुफानी खेळी
मुंबई संघासाठी कर्णधार हरमनप्रीतने 30 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान तिने 2 षटकार आणि 7 चौकार मारले. तिचा स्ट्राईक रेटही फलंदाजांमध्ये सर्वाधिक 170 होता. हरमनशिवाय यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) 44 आणि नेट-सिव्हर ब्रंटने 36 धावा केल्या. गोलंदाज अॅश्ले गार्डनरने 3 विकेट्स घेतल्या.
गुजरातचा संघ 107 धावांवर गारद
163 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना गुजरात जायंट्सचा संघ 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 107 धावाच करु शकला. मुंबई इंडियन्सने हा सामना 55 धावांनी जिंकला. गुजरात संघाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 22 धावा केल्या. कर्णधार स्नेह राणाने 20 धावा केल्या. याशिवाय एकाही खेळाडूला 20 चा आकडा गाठता आलेला नाही.
नॅट सिव्हर-ब्रंट आणि हीली मॅथ्यूज गोलंदाजी करताना दिसले. या दोन्ही गोलंदाजांनी 3-3 विकेट्स आपल्या नावावर करत गुजरातच्या संपूर्ण संघाला माघारी धाडलं. अमेलिया केरनेही 2 विकेट्स घेतल्या.
बंगळुरुला एकही सामना जिंकता आलेला नाही
पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स सध्या पाचही सामने जिंकून 10 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. संघाचे ग्रुप स्टेजमध्ये अजून तीन सामने बाकी आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्स 8 गुणांसह दुसऱ्या तर यूपी वॉरियर्स 4 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात संघाने आपल्या 5 सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. तर पाचव्या आणि शेवटच्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंतचे सर्व पाच सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :