(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WPL 2023 : ऑरेंज कॅपसाठी 'या' तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये चुरस, पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहेत टॉप-3?
WPL 2023 Stats : महिला प्रीमियर लीगमध्ये, ऑरेंज कॅप सध्या ऑस्ट्रेलियन फलंदाज मेग लॅनिंग आणि भारतीय फिरकीपटू सायका इशाक यांनी पर्पल कॅपवर कब्जा केलेला आहे.
WPL 2023 Orange cap and Purple Cap : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत सर्व सामने अगदी रोमांचक होत आहे. महिला खेळाडू अगदी धमाकेदार क्रिकेट खेळत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खास रेकॉर्ड करत आहेत. महिला प्रीमियर लीगच्या या पहिल्या सत्रात एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील 11 सामने आतापर्यंत झाले आहेत. म्हणजे स्पर्धेतील 50 टक्के सामने खेळले गेले आहेत. आयपीएलप्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही आघाडीच्या धावा करणाऱ्या खेळाडूच्या डोक्यावर ऑरेंज कॅप असते, तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी असते. सध्या या अर्ध्या स्पर्धेनंतर ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि पर्पल कॅपवर भारतीय फिरकीपटू सायका इशाक यांचा ताबा आहे. या दोन खेळाडूंना कोणाकडून चॅलेंज मिळणार आहे, जाणून घेऊया...
WPL मध्ये धावा करणारे टॉप-3
- ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग सध्या WPL मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने 5 डावात 55.25 च्या सरासरीने आणि 138.99 च्या स्ट्राईक रेटने 221 धावा केल्या आहेत. त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे.
- WPL चा दुसरी आघाडीचा स्कोअरर देखील ऑस्ट्रेलियाचा आहे. आरसीबीच्या एलिस पेरीने 5 डावात 48.75 च्या सरासरीने आणि 137.32 च्या स्ट्राइक रेटने 195 धावा केल्या आहेत.
- ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज आणि यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने 4 डावात 61.66 च्या सरासरीने आणि 156.77 च्या स्ट्राइक रेटने 185 धावा केल्या आहेत.
WPL मध्ये विकेट्स घेणारे टॉप-3
- मुंबई इंडियन्सची भारतीय फिरकीपटू सायका इशाकने 4 सामन्यात 6.91 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 5.85 च्या इकॉनॉमी रेटने 12 बळी घेतले आहेत. त्यामुळे तिच्याकडे पर्पल कॅप आहे.
- यूपी वॉरियर्सची इंग्लिश गोलंदाज सोफी एक्लेस्टोनने 4 सामन्यात 13.62 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 7.03 च्या इकॉनॉमी रेटने 8 बळी घेतले आहेत.
- दिल्ली कॅपिटल्सची भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेनेही 8 विकेट घेतल्या आहेत. त्याने 5 सामन्यात 16.25 च्या गोलंदाजीची सरासरी आणि 6.84 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे.
WPL सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
महिला संघात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
हे देखील वाचा-