Mumbai Indians Commentary : 'सू्र्या'च्या धमाकेदार फलंदाजीवर ईशान किशनची भोजपुरीत कॉमेंट्री, तुम्ही Video पाहिला का?
Ishan Kishan Bhojpuri English Hindi Commentary : मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादव नेट प्रॅक्टिसमध्ये दमदार फलंदाजी करत असताना ईशान किशन हिंदी, इंग्रजीसह भोजपुरी भाषेत कॉमेंट्री करताना दिसत आहे.
Ishan Kishan Commentary on Suryakumar Yadav Batting : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मधील आगामी सामन्याच्या सरावासाठी घाम गाळताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स संघाला अद्याप आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये खातं खोलता आलेलं नाही. त्यामुळे आगामी सामना संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. यामुळे पहिल्या विजयासाठी मुंबई संघ नेट प्रॅक्टिकमध्ये कठोर परिश्रम करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स संघाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात. नुकताच मुंबई संघाने एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फलंदाज सूर्यकुमार यादव नेटमध्ये मोठ-मोठे शॉट मारताना दिसत आहे. तर त्याच्या मागे उभा असलेला ईशान किशन सूर्याच्या दमदार फलंदाजीवर कॉमेंट्री करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ईशान किशन एक किंवा दोन नाही तर तीन भाषांमधअये कॉमेंट्र करताना दिसत आहे. ईशान हिंदी, इंग्रजी आणि भोजपुरी या तीन भाषांमध्ये सुर्यकुमारच्या दमदार खेळीचं वर्णन केलं आहे.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडीओ पाहा :
View this post on Instagram
IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्स खातं उघडणार
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंंडियन्स यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवण्यासाठी उतरणार आहे. मुंबईचा आयपीएल 2023 (IPL) च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) पराभव झाला. आता शनिवारी 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे दोन संघ (CSK vs MI) आमनेसामने असतील. हा मुंबई संघाचा दुसरा तर चेन्नई संघाचा तिसरा सामना असेल.
सूर्यकुमारच्या दमदार फलंदाजीची झलक
Your morning dose of ☀️#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @surya_14kumar pic.twitter.com/R7Jsk3N993
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 Suryakumar Yadav : 'सूर्या'ची झलक! मुंबई इंडियन्सकडून दमदार फलंदाजीचा व्हिडीओ शेअर