(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Most Runs in IPL Season : जोस बटलरच्या नावावर खास विक्रम, IPL इतिहासात असा करणारा तिसरा फलंदाज
RR vs RCB : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय.
RR vs RCB : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या जोस बटलरने शतकी खेळी केली. जोस बटलरचे यंदाच्या हंगामातील चौथं शतक होतं. जोस बटलरने यंदाच्या हंगामात 824 धावांचा पाऊस पाडला आहे. यासह बटलरने खास विक्रम नावावर केलाय.
आयपीएलच्या इतिहासात 800 पेक्षा जास्त धावा करणारा जोस बटलर तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी हा पराक्रम विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांनी केलाय. विराट कोहली आणि वॉर्नर यांनी 2016 मध्ये 800 पेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावांचा पाऊस पाडला होता तर वॉर्नरने 848 धावा केल्या होत्या. 824 धावा करत जोस बटलर वॉर्नर आणि कोहलीच्या क्लबमध्ये सामील झालाय. जोस बटलरने यंदाच्या हंगामातील चौथं आणि आयपीएलमधील पाचवे शतक झळकावलेय. जोस बटलरने याबाबत विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. आयपीएलमध्ये युनिवर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. आयपीएलमध्ये ख्रिस गेलने सहा शतके झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम -
ख्रिस गेल- 6 शतके
विराट कोहल/जोस बटलर- 5 शतके
शेन वॉटशन, डेविड वॉर्नर, केएल राहुल- 4 शतके
एका टी20 सिरीजमध्ये सर्वाधिक शतके
4 शतके: विराट कोहल (IPL 2016)
4 शतके: जोस बटलर (IPL 2022) *
3 शतके: मायकल क्लिंगर (T20 Blast 2015)
आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारे फलंदाज -
122 धावा: वीरेंद्र सहवाग, PBKS v CSK 2014 (Q2)
117*: शेन वॉटसन, CSK v SRH 2018 (Final)
115*: ऋद्धिमान साहा, PBKS v KKR 2014 (Final)
113: मुरली विजय, CSK v DC 2012 (Q2)
112*: रजत पाटीदार, RCB vs LSG 2022 (Eliminator)
106*: जोस बटलर, RR vs RCB 2022 (Q2)
सामन्याचा लेखाजोखा -
जोस बटलरची शतकी (106) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गड्यांनी विजय मिळवलाय. या पराभवासह आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. राजस्थान रॉयल्सने 2008 नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता 29 मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे. 158 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामी फलंदाजांनी विस्फोटक सुरुवात केली. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी 5 षटकात 61 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वालने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने 21 चेंडूत 23 धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. बटलरने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहचवलं.आहे.