एक्स्प्लोर

KKR vs MI Playing 11: रोहित शर्माची पलटन की नितीश राणाचे योद्धा; प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबाबत सर्वकाही जाणून घ्या

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आज आयपीएलमध्ये रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगणार आहे.

MI vs KKR, IPL 2023 Match 22 : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारच्या डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल 2023 मधील (IPL 2023) 22 वा सामना पाहायला मिळणार आहे. 16 एप्रिलला रंगणाऱ्या सामन्यात बई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे दोन संघ मैदानात आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 16 व्या (IPL 2023) हंगामातील ही लढत मुंबईच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर (Wankhede Stadium) पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. कारण संघाचा आयपीएल 2023 मधील तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवू शकला आहे.

MI vs KKR, IPL 2023 Match 22 : मुंबई आणि कोलकाता आमने-सामने

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात (IPL 2023) मुंबई आणि कोलकाता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने या विजयासह आपलं खातं उघडलं. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन सध्या नवव्या स्थानावर असून सध्या मुंबईची पलटन विजयी घोडदौडीसाठी सज्ज झाली आहे.

IPL 2023 Match 22 : कोण मारणार बाजी?

कोलकाता नाईट रायडर्सला सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. नितीश राणा यांच्या नेतृत्वाखालील संघ सध्या दोन विजय आणि दोन पराभवांसह आयपीएल गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं संघाचं लक्ष्य असेल.

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

आयपीएल 2023 मध्ये 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.

MI vs KKR Probable Playing 11: दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंन 11

MI Playing 11: मुंबई संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, अर्शद खान, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.

KKR Playing 11: कोलकाता संभाव्य प्लेईंग 11

एन जगदीशन (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायण, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

IPL 2023, MI vs CSK : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget