MI vs KKR Live Updates : कोलकात्याचा मुंबईवर 53 धावांनी विजय
MI vs KKR, IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज लढत होणार आहे.

Background
MI vs KKR, IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज लढत होणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 सामन्यांत केवळ चार विजयांची नोंद करणाऱ्या कोलकात्याला उर्वरित तीन सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडं मुंबईचा संघ केवळ सन्मान वाचवण्यासाठी या स्पर्धेत खेळत आहे.
मुंबई- कोलकाता हेड टू हेड रेकार्ड
आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे.
मुंबईचा संभाव्य इलेव्हन:
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय/बेसिल थम्पी, जसप्रीत बुमराह, आर. मेरेडिथ.
कोलकात्याचा संभाव्य इलेव्हन:
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन/बाबा इंद्रजित (विकेटकीपर), आंद्रे रसल, अमन खान/अनुकुल रॉय, सुनील नरायण, टीम साऊथी, उमेश यादव/हर्षित राणा, शिवमहर्षी.
हे देखील वाचा-
कोलकात्याचा मुंबईवर 53 धावांनी विजय
165 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईचा जाव 113 धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून ईशान किशनने 51 धावांची खेळी केली.
MI vs KKR Live Updates : मुंबईला नववा धक्का, पोलार्डही बाद
डॅनिअल सॅम्स, एम अश्विन आणि कुमार कार्तिकेय एकापाठोपाठ एक बाद झाले. पोलार्ड 15 धावा काढून धावबाद झाला.




















