IPL 2022 : जोस द बॉसकडेच ऑरेंज कॅप, पण या खेळाडूंकडून मिळतेय आव्हान
IPL 2022 Marathi News : राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलर IPL च्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणारा फलंदाज आहे.
IPL 2022 Orange Cap : राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलर IPL च्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणारा फलंदाज आहे. दुसऱ्या आठवड्यापासून ऑरेंज कॅप बटलरकडेच आहे. बटलरने धावांचा पाऊस पाडलाय. पण जोस बटलरला लखनौ आणि आरसीबीच्या कर्णधाराकडून कडवी टक्कर मिळत आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. बटलरने 11 सामन्यात 152.21 स्ट्राईक रेटने 618 धावा चोपल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या केएल राहुलच्या नावावर 451 धावा आहेत. 389 धावांसह फाफ तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. शिखर 381 धावांसह चौथ्या तर 356 धावांसह वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे.
क्रमांक | फलंदाज | सामने | धावा | सरासरी | स्ट्राइक रेट |
1 | जोस बटलर | 11 | 618 | 61.80 | 152.21 |
2 | केएल राहुल | 11 | 451 | 50.11 | 145.01 |
3 | फाफ डु प्लेसिस | 12 | 389 | 35.36 | 132.76 |
4 | शिखर धवन | 11 | 381 | 42.33 | 122.11 |
5 | डेविड वॉर्नर | 9 | 375 | 53.57 | 156.90 |
पर्पल कॅप -
ऑरेंज कॅप प्ररमाणेच पर्पल कॅपही राजस्थानच्या खेळाडूकडे आहे. यजुवेंद्र चहलने 11 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर वानंदु हसरंगा 12 सामन्यात 21 विकेट घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडा 18, कुलदीप यादव 18 आणि नटराजन 19, अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
लखनौ पहिल्या क्रमांकावर -
गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.