MS Dhoni: धोनी जैसा कोई नही! टी-20 मध्ये 200 झेल घेणारा पहिला विकेटकिपर
MS Dhoni Records: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
MS Dhoni Records: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) टी-20 क्रिकेटमध्ये आणखी एक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात त्यानं टी-20 क्रिकेटमधील 200 वा झेल पकडला. या कामगिरीसह टी-20 क्रिकेटमध्ये 200 झेल पकडणार धोनी पहिलाच विकेट ठरला आहे. दरम्यान, ड्वेन ब्राव्होच्या चेंडूवर शार्दुल ठाकूरचा झेल घेऊन धोनीनं नवा पराक्रम केला आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये 40 वर्षीय एमएस धोनी 200 झेलसह पहिल्या स्थानावर आहे. तर, भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक 182 झेलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कमरान अकमल, क्विंटन डी कॉक, दिनेश रामदीन यांचा क्रमांक लागतो.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणारे विकेटकिपर-
क्रमांक | विकेटकिपरचं नावं | एकूण झेल |
1 | महेंद्रसिंह धोनी | 200 |
2 | दिनेश कार्तिक | 182 |
3 | कामरान अकमल | 172 |
4 | क्विंटन डी कॉक | 166 |
5 | दिनेश रामदीन | 150 |
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2022 चा 55 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघानं चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे (87), ऋतुराज गायकवाड (41) यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं 20 षटकात दिल्लीसमोर 209 धावांचं लक्ष्य ठेवलं.प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 17.4 षटकांत केवळ 117 धावांत आटोपला. ज्यामुळं चेन्नईच्या संघान यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात चेन्नईनं दिल्लीला 91 धावांनी विजय मिळवला आहे.
हे देखील वाचा