MI vs GT : गुजरातच्या होमग्राऊंडवर मुंबईची कसोटी, कोण मिळवणार फायनलचं तिकीट? अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत जाणून घ्या
IPL 2023 Qualifier 2 : आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
MI vs GT, Narendra Modi Stadium : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज, 26 मे रोजी गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात दुसऱ्या क्वालिफायर सामना (IPL 2023 Qualifier 2) होणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) कडून गुजरात टायटन्स (GT) संघ 15 धावांनी पराभूत झाला. त्यानंतरच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला. आता अहमदाबाद येथे दुसरा क्वालिफायर सामना मुंबई आणि गुजरात यांच्यात होणार आहे. आयपीएल 2023 चा अंतिम सामनाही याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअम हे गुजरात टायटन्स संघाचं होमग्राऊंड आहे. या खेळपट्टीबाबत अधिक माहिती असल्यामुळे गुजरात संघाला याचा फायदा होईल. मुंबई इंडियन्स (MI) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी आणि आकडेवारीवर कशी आहे याबाबत जाणून घ्या.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
MI vs GT Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन :
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन :
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.