एक्स्प्लोर

IPL 2023 : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 'एल-क्लासिको'? चेन्नईसह फायनल गाठण्यासाठी मुंबईला करावा लागेल गुजरातचा पराभव

IPL 2023, MI vs GT : आजच्या सामन्यात मुंबईने गुजरातला हरवल्यास MI चेन्नई (CSK) सह अंतिम फेरीत दाखल होईल. असं झाल्यास आयपीएलच्या अंतिम सामना मुंबई विरुद्ध चेन्नई 'एल-क्लासिको' होईल.

IPL 2023 Qualifier 2, GT vs MI : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमातील दुसरा क्वालिफायर (IPL 2023 Qualifier 2) सामना आज गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघात रंगणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आजच्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळाल्यास मुंबई संघाला अंतिम फेरीत एन्ट्री मिळेल. यामुळे आयपीएल 2023 चा अंतिम सामना मुंबई विरुद्ध चेन्नई अशी 'एल-क्लासिको' लढत पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांचा सामना सर्वात रोमांचक मानला जातो. चेन्नई संघाला यंदा मुंबई संघासोबत पाच वेळा आयपीएल विजेते होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

आयपीएलचा अंतिम सामना 'एल-क्लासिको'?

आयपीएल 2023 च्या पहिला क्वालिफायर सामना जिंकून चेन्नई सुपर किंग्स संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली. प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सला पराभव केला आणि फायनलचं तिकीट मिळवलं. चेन्नई विरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतरही गुजरात संघाला आज दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघ मैदानात उतरेल. या सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केल्यास मुंबई इंडियन्स अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल आणि असे झाल्यास आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने येतील. 

आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत 'एल-क्लासिको' सामना

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघामधील सामन्याला एल-क्लासिको असं म्हटलं जातं. या दोन संघांच्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच लक्ष लागलेलं असतं. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघ सर्वाधिक वेळा आयपीएल विजेते आहेत. तसेच, दोन्ही संघांचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.

एल-क्लासिको म्हणजे काय?

एल-क्लासिको (El Clásico) हा स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ उत्कृष्ट असा आहे. दोन उत्कृष्ट संघांमधील लढत म्हणजेच दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांतील सामन्याला 'एल क्लासिको' म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील सामन्याला 'एल क्लासिको' म्हणलं जातं, कारण दोन्ही संघ लीगमधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे, इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्याला एल क्लासिको असं म्हटलं जातं. कारण, मुंबई इंडियन्स संघ सर्वाधिक 5 वेळा आयपीएल विजेता आहे. तर, चेन्नई संघही 4 वेळा आयपीएल विजेता ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या  :

IPL Qualifier 2 : मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमध्ये विक्रम, रोहित शर्माचा संघ प्लेऑफमध्ये अजिंक्य, हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढणार?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Embed widget