MI vs GT : मुंबई इंडियन्सचं नेमकं कुठं चुकलं, गुजरातनं हातून गेलेला सामना जिंकला, जाणून घ्या मॅचचा टर्निंग पॉइंट
IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिले पाच सामने पार पडले आहेत. आयपीएलमधील पहिली मॅच मुंबईनं दरवर्षीप्रमाणं गमावली आहे. गुजरातच्या बॉलर्सनं मुंबईचा विजय हिरावून घेतला.
अहमदाबाद : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 2024 च्या आयपीएलची पाचवी मॅच पार पडली. अखेरच्या ओव्हरपर्यंत कधी मॅच कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता. मुंबईची स्थिती 12 व्या ओव्हरपर्यंत एकहाती मॅच जिंकणार अशी होती. मात्र, 13 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर मुंबईच्या 129 धावा झालेल्या असताना डेवाल्ड ब्रेविस बाद झाला. यानंतर मुंबईच्या बॅटसमनच्या विकेटची मालिका सुरु झाली.
मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट
मुंबई इंडियन्सचा संघ 13 व्या ओव्हरपर्यंत मजबूत स्थितीत होता. रोहित शर्मा आणि नमन धीर यांची 30 धावांची भागिदारी झाली होती. नमन धीर 20 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात 77 धावांची भागिदारी झाली. रोहित शर्माला रविश्रीनिवासन साई किशोरनं एलबीडब्ल्यू आऊट केलं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिलक वर्मा बॅटिंगला आहे रोहित शर्मानं 43 धावा केल्या. दुसरीकडे डेवाल्ड ब्रेविल्स मुंबईच्या 129 धावा झाल्यानंतर 46 धावांवर बाद झाला. डेवाल्ड ब्रेविल्सचा कॅच बॉलिंग करणाऱ्या मोहित शर्मानं घेतला. मोहित शर्मानं ही विकेट घेतल्यानंतर हार्दिक पांडया बॅटिंगला येईल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र त्याच्याऐवजी टीम डेविड आला. डेविनं 10 बॉलमध्ये 11 रन केल्या परिणामी नेट रनरेट वाढलं.
डेवाल्ड ब्रेविसला बाद करणाऱ्या मोहित शर्मानं टीम डेविडला बाद केलं. मोहित शर्माचा स्पेल आणि हार्दिक पांड्याचा डेविड अगोदर बॅटिंगला न येण्याचा निर्णय हा मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरला.
अखेरची ओव्हर थरारक...
मुंबई इंडियन्सच्या 19 व्या ओव्हरपर्यंत 7 बाद 150 धावा झाल्या होत्या. टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या स्ट्राइकवर होता. मुंबईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती. उमेश यादवला गुजरात टायटन्सनं मोहम्मद शमीला रिप्लेसमेंट म्हणून संधी दिली होती. उमेश यादवच्या कामगिरीवर गुजरातच्या जय पराजय अवलंबून होता. हार्दिक पांड्यानं पहिल्याच बॉलवर उमेश यादवला सिक्सर मारला. हार्दिक पांड्यानं दुसऱ्या बॉलवर चौकार मारत पहिल्या दोन बॉलमध्ये 10 धावा काढल्या. मुंबईला शेवटच्या चार बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. मात्र, उमेश यादवला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या कॅच आऊट झाला. यानंतर पुढच्या बॉलवर पियुष चावला देखील आऊट झाला. शेवटच्या दोन बॉलवर मुंबईला केवळ दोन रन करता आल्या आणि गुजरातनं विजय मिळवला.
दरम्यान, मुंबई इंडियन्सनं दरवर्षीच्या आयपीएलप्रमाणं यावेळी देखील पहिली मॅच गमावली आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 GT vs MI : बूम बूम बुमराहपुढे गुजरातचं लोटांगण, मुंबईनं 168 धावांवर रोखलं