एक्स्प्लोर

MI vs CSK, Preview : रोहित विरुद्ध धोनी, वानखेडेवर जंगी सामना; मुंबई पलटण पहिला विजय मिळवणार की, चेन्नई मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवणार

IPL 2023 Match 12 CSK vs MI : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात 8 एप्रिल रोजी आयपीएल 2023 (IPL 2023) मधील बारावा सामना रंगणार आहे.

Chennai Super Kings vs Mumbai Indians : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शनिवारी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात 8 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि महेंद्र सिंह धोनी यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. तर चेन्नई दुसरा विजय मिळवून गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेल.

MI vs CSK Match 12 Preview : चेन्नई विरुद्ध मुंबई

मुंबई इंडियन्स शनिवारी यंदाच्या मोसमातील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून पराभव झाला होता. तर दुसरीकडे चेन्नई संघाचा हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. पण, दुसऱ्या सामन्यात चेन्नईनं खातं उघडलं.

MI vs csk Head to Head : कुणाचं पारड जड?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईचं पारडं जड दिसून आलं आहे. 34 सामन्यांपैकी मुंबई संघाने 20 सामने तर चेन्नई संघाने 14 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 होती. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. 

IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्स खातं उघडणार

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात मुंबई इंंडियन्स यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवण्यासाठी उतरणार आहे. मुंबईचा आयपीएल 2023 (IPL) च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) पराभव झाला. आता शनिवारी 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे दोन संघ (CSK vs MI) आमनेसामने असतील. हा मुंबई संघाचा दुसरा तर चेन्नई संघाचा तिसरा सामना असेल.

IPL 2023, CSK vs MI : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना 8 एप्रिल रोजी मुंबईतील येथील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023, MI vs CSK live : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget