(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : मुंबईची पलटन सज्ज! MI ची दोन वर्षानंतर घरवापसी, वानखेडे स्टेडिअमवर रंगणार चेन्नईविरुद्धचा सामना
MI Return to Wankhede : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर घरवापसी करणार आहे. यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवण्यासाठी मुंबई संघ जोरदार तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.
IPL 2023, MI vs CSK, Mumbai Indians Return to Wankhede Stadium : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईची पलटन दोन वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सामना खेळणार आहे. कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्ष वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल सामने खेळवण्यात आले नव्हते. मात्र, आता मुंबईच्या चाहत्यांच्या उत्साहात मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्स आगामी सामन्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. आयपीएल 2023 मध्ये शनिवारी मुंबई आणि चेन्नई संघ आमने-सामने येणार आहेत.
IPL 2023, MI on Wankhede : मुंबई इंडियन्सची 2 वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर घरवापसी
आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शनिवारी वानखेडे स्टेडिअमवनर म्हणजेच मुंबईच्या घरच्या मैदानावर संघ पहिला विजय मिळवून यंदाच्या मोसमात खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे चाहत्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहता आला नव्हता. पण आता मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई संघाच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळताना पाहायला मिळतंय.
IPL 2023, Mumbai Indians on Wankhede : मुंबईची पलटन सज्ज
मुंबई इंडियन्सचा संघ आगामी सामन्यासाठी कसून मेहनत करत आहे. फलंदाज, गोलंदाज असे सर्वच खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्स संघाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर मुंबईने संघाच्या सरावादरम्यानचे वेळोवेळीचे अपडेट शेअर केले आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा संघ मुंबईत दाखल झला असून त्यांच्याकडूनही कसून सराव सुरु आहे.
Mission 🆆 👉 #MIvCSK
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2023
आपले boys sweat it out ahead of our much-anticipated first game at the 𝗪𝗮𝗻𝗸𝗵𝗲𝗱𝗲 🏟️💙#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 MI TV pic.twitter.com/Gyrjvi4HMB
IPL 2023, MI vs CSK : मुंबई विरुद्ध चेन्नई लढत
मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. देशांतर्गत सामना असो, आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय सामना, येथे धावांचा पाऊस पडतो. शनिवारी होणार्या सामन्यात येथे चौकार आणि षटकारांची भर पडू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :