एक्स्प्लोर

IPL 2022 : गुजरात टायटन्सला झटका, जेसन रॉयची माघार

जेसन रॉयने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून माघार घेतली आहे. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसनची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा झटका समजला जात आहे.

IPL 2022 : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलच्या पंधराव्या मोसमातून आपलं नाव मागे घेतलं आहे. गुजरात टायटन्सने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जेसनने आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या निर्णयाची माहिती गुजरात टायटन्सलाही दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने याबाबतची माहिती गुजरात संघ व्यवस्थापनाला दिल्याचं कळतं. 

जेसन रॉयची माघार ही गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का आहे. लवकरच जेसनच्या जागी नव्या खेळाडूला संघात संधी मिळेल. 

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात 26 मार्च रोजी होणार आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदा आयपीएलमध्ये 10 संघांचा समावेश करण्यात आला असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ग्रुप बीमध्ये असून यात चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि पंजाबचा समावेश आहे.

बायो बबलमुळे माघार 
नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) जेसन रॉयने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. बराच काळ बायो बबलमध्ये राहून येणाऱ्या आव्हानाचा दाखल देत जेसनने आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएलदरम्यानही बायो बबलमध्ये राहावं लागल्यास त्याला कुटुंबापासून दूर राहावं लागेल. शिवाय दोन महिन्यापूर्वींच त्याच्या दुसऱ्या अपत्याचा जन्म झाला आहे.

2020 मध्येही जेसन रॉयने आयपीएलमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने जेसन रॉयला 1.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता.

इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉयने याआधी गुजरात लायन्स (2017), दिल्ली कॅपिटल्स (2018) आणि सनरायझर्स हैदराबाद (2021) संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. या लीगमध्ये त्याने आतापर्यंत केवळ 13 सामने खेळले असून त्याच्या नावावर 329 धावा जमा आहे. रॉयने आयपीएलमधील पदार्पण 2017 मध्ये गुजरात लायन्स संघातून केलं होतं. त्याचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरोधात खेळला होता. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला फीट ठेवण्याचा जेसन रॉयचा प्रयत्न आहे.

पीएसएलमध्ये शानदार कामगिरी
पाकिस्तान सुपर लीगमध्येही जेसन रॉयने आपला जलवा दाखवला. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना त्याने सहा सामन्यात 303 धावा केल्या. त्याने सहा डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकं लगावली. पहिल्या सामन्यात जेसन रॉयने लाहोर कलंदरविरोधात 116 धावा केल्या होत्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP MajhaSanjay Raut जातीय तेढ निर्माण करतायत, शिंदेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
मतदानाच्या आदल्यादिवशीच 'प्रिसायडिंग ऑफिसर'चा मृ्त्यू; ठाण्यात होमगार्डला ह्रदयविकाराचा झटका
Embed widget