LSG vs MI Live Score Updates: मुंबईचा सलग आठवा पराभव, लखनौचा 36 धावांनी विजय
मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ आणि मुंबई इंडियन्सचा (Lucknow Super Giants, Mumbai Indians) संघ एकमेकांशी भिडणार आहे.

Background
LSG vs MI LIVE: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ आणि मुंबई इंडियन्सचा (Lucknow Super Giants, Mumbai Indians) संघ एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहेत. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) लखनौच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात मुंबईच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईनं आतापर्यंत सात सामने खेळले असून एकही सामना जिंकलेला नाही. तर, दुसरीकडं लखनौच्या संघानं सात पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबईची निराशाजनक कामगिरी
मुंबईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर गेलाय. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी त्यांना पुढील सातही सामने जिंकावे लागतील. परंतु, त्यानंतरही त्यांना प्लेऑफमध्ये जागा मिळेल, हे निश्चित नसणार. इतर संघाच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून राहवं लागणार आहे.
कधी कुठे पाहणार सामना?
आज 24 एप्रिल रोजी होणारा मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
लखनौचा संभाव्य संघ-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
मुंबईचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शॉकीन, रायले मेरेडिथ, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह.
हे देखील वाचा-
- LSG vs MI: अर्जून तेंडूलकर पदार्पण करणार? लखनौ- मुंबईची अशी असू शकते प्लेईंग इलेव्हन
- IPL 2022 Playoffs: प्लेऑफच्या सामन्यांसाठी ठिकाण ठरलं! प्रेक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत रंगणार लढती, पाहा संपूर्ण वेळापत्रक
- LSG vs MI: लखनौ-मुंबई सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार? कायरन पोलार्ड, केएल राहुलवर सर्वांची नजर
मुंबईचा सलग आठवा पराभव, लखनौचा 36 धावांनी विजय
LSG Vs MI: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आ
LSG vs MI LIVE : तिलक वर्मा आणि कायरन पोलार्डनं संघाचा डाव सावरला
लखनौविरुद्ध मुंबईच्या संघानं चार विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि कायरन पोलार्डनं संघाचा डाव सावरला आहे. तिलक वर्मान 23 चेंडूत 35 धावा तर, कायरन पोलार्डनं संयम दाखवत 16 चेंडूत 16 धावा केल्या आहेत.




















