LSG vs MI: लखनौ-मुंबई सामन्यात विक्रमांचा पाऊस पडणार? कायरन पोलार्ड, केएल राहुलवर राहणार सर्वांची नजर
LSG vs MI: आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत.
LSG vs MI: आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) आमने-सामने येणार आहेत. या हंगामातील दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहे. मागच्या लढतीत लखनौच्या संघानं मुंबईला पराभूत केलं होतं. या हंगामात लखनौच्या संघानं चार सामने जिंकले आहेत. तर, मुंबईचा संघ या हंगमातील आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. मुंबईच्या संघानं आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. हे सर्व सामन्यात मुंबईला पराभव पत्कारावा लागला. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. तर, मुंबईचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे.
केएल राहुल
लखनौचा कर्णधार केएल राहुलला आयपीएलमधील 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ पाच षटकारांची गरज आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात त्यानं पाच षटकार मारल्यास तो तो रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांच्यानंतर आयपीएलमध्ये 300 पेक्षा अधिक चौकार आणि 150 षटकार मारणारा सातवा भारतीय खेळाडू ठरेल.
कायरन पोलार्ड
मुंबईचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डनं आयपीएलमध्ये 221 षटकार मारले आहेत. एमएस धोनीला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी दोन षटकार मारावे लागतील. ज्यानंतर तो आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चौथ्या स्थानावर विराजमान होईल. याशिवाय, आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण करण्यापासून तो दोन झेल दूर आहे.
सूर्यकुमार यादव
मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 2000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला 35 धावांची गरज आहे. याशिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या टॉप-5 यादीत प्रवेश करण्यासाठी त्याला आणखी दोन झेल घेण्याची गरज आहे.
मार्कस स्टॉयनिस
टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी मार्कस स्टॉयनिसला 62 धावांची आवश्यकता आहे. तर, आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 14 धावांची गरज आहे. मुंबईविरुद्ध आजच्या सामन्यात वरील विक्रम करण्याची अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-