एक्स्प्लोर

KKR vs SRH, IPL 2023 Live: हैदराबाद-कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

KKR vs SRH Match: कोलकाता आणि हैदराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. हैदराबाने कोलत्याला कोलकात्यात हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज कोलताता मैदानात उतरेल.

Key Events
KKR vs SRH Score Live Updates Marathi Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2023 Live streaming ball by ball commentary KKR vs SRH, IPL 2023 Live: हैदराबाद-कोलकाता यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
SRH vs KKR, IPL 2023

Background

IPL 2023, Match 47, KKR vs SRH:  हैदराबाद आणि कोलकाता या तळाच्या दोन संघामध्ये आज सामना होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. गुणतालिकेत ऑरेंज आर्मी सहा गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. तर नाईट रायडर्स सहा गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने नऊ सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद संघाने आठ सामन्यात तीन विजयावर शिक्कामोर्तब केलेय. कोलकाता आणि हैदराबाद यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. हैदराबाने कोलत्याला कोलकात्यात हरवले होते. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज कोलताता मैदानात उतरेल. तळाच्या दोन संघातील आजचा सामना रोमांचक होईल. 

 
सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला इडन गार्ड्नस मैदानावर 23 धावांनी हरवले होते. या  सामन्यात हॅरी ब्रूक याने शतकी खेळी केली होती. हे यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक होते. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक झाला होता. पण अखेरीस हैदराबादने बाजी मारली. हैदराबादने कोलकात्याला घरच्या मैदानावर हरवले. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी कोलकाता मैदानावर उतरणार आहे.  कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघाला प्लेऑफधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. हैदराबादने आपल्या मागील सामन्यात दिल्लीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्करमच्या नेतृत्वातील संघाचा आत्मविश्वास बळावला असेल. तर कोलकाता नाइट राइडर्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गुजरातने कोलकात्याचा पराभव केला होता. कोलकाता विजयाच्या पटरीवर परतण्यास उत्सुक असेल तर हैदराबाद विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरी -  

फलंदाजांच्या खराब कामगिरीचा फटका कोलकाता संघाला बसला आहे. नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शाकिब अल हसन या दोन अनुभवी खेळाडूंची कमी कोलकात्याला जाणवत आहे. चेन्नईविरोधात कोलकात्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. फलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नांगी टाकली.  वेंकटेश अय्यर,  नितीश राणा, एन जगदीशन, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनी विकेट फेकल्या.  

रसेलचा फ्लॉप शो - 

आतापर्यंत आंद्रे रसेल लयीत दिसला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीत रसेल फ्लॉप जातोय. त्याची फिटनेसही कोलकात्याची डोकेदुखी वाढवणारी आहे. आतापर्यंत रसेल याला एकाही सामन्यात चार षटके गोलंदाजी करता आलेली नाही. रिंकू सिंह याने काही सामन्यात वादळी फलंदाजी केली आहे. हीच काय ती नीतीश राणा आणि टीमसाठी जमेची बाजू आहे. 

हैदराबादपुढे काय आव्हाने - 

हैदराबादला आघाडीच्या फंलदाजांकडून हवे तसे योगदान मिळत नाही. मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. कर्णधार एडन मार्करम यालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. आघाडीचे फलंदाज सातत्याने फ्लॉप जात आहेत, हैदराबादपुढे हेच मोठे आव्हान आहे. हैदराबादला विजयासाठी आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. 

कसे आहेत दोन्ही संघ -

सनरायजर्स हैदराबाद : विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र सिंह यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसेन, अनमोलप्रीत सिंह, अब्दुल समद, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्करम (कर्णधार), मार्को जानसन, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारूकी, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल राशिद, मयंक मारकंडे

कोलकाता नाइट राइडर्स : नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, सुयश शर्मा, कुलवंत खेजरोलिया, अनुकुल राय, लॉकी फर्ग्यूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिटन दास, मनदीप सिंह

23:22 PM (IST)  •  04 May 2023

कोलकात्याने हैदराबादचा केला पराभव

कोलकात्याने हैदराबादचा केला पराभव

23:19 PM (IST)  •  04 May 2023

हैदराबादला विजयासाठी दोन चेंडूत सात धावांची गरज

हैदराबादला विजयासाठी दोन चेंडूत सात धावांची गरज

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL 2026 Orange Cap: विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?
विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?
PBKS vs MI IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? हार्दिक पांड्याशिवाय धर्मशालाला पोहोचली टीम, सूर्याही अचानक गायब, नेमकं चाललंय तरी काय?
मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? हार्दिक पांड्याशिवाय धर्मशालाला पोहोचली टीम, सूर्याही अचानक गायब, नेमकं चाललंय तरी काय?

व्हिडीओ

Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टरांची संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
रात्री अकराला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट, पुन्हा परत घरी आले अन् पहाटे अखेरचा श्वास; अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावासोबत नेमकं काय घडलं? मृत्यूवर सनसनाटी दावे
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह बक्षीस का? NEET पेपरफुटीवर जयंत पाटील भडकले
Embed widget