KKR vs RR: कोलकाता अन् राजस्थान समोर 'करो या मरो'ची स्थिती; पराभूत संघाचं अस्तित्व जवळपास संपुष्टातच
KKR vs RR: संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ विजया मिळवण्यालाठी मैदानात उतरेल. राजस्थानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
KKR vs RR: आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात अद्याप प्लेऑफचा एकही संघ मिळालेला नाही. गुजरात (Gujarat Titans) आणि चेन्नई (CSK) संघ पॉईंट टेबलवर आघाडीवर आहेत. कोलकाता (KKR) आणि राजस्थान (RR) संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं अनिवार्य आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाचे समान 10 गुण आहेत. नेटरनरेटमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत कोलकात्यापेक्षा पुढे आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पराभूत संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात येईल, तर विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे करो या मरो च्या स्थितीत असलेले दोन्ही संघ आज मैदानात एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. विजय मिळवून प्लेऑफमध्ये कोण दाखल होणार? आणि कोणाचं आव्हान संपुष्टात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IPL 2023 मध्ये पहिल्यांदाच आमने-सामने
IPL 2023 च्या सीजनमधील केकेआर आणि राजस्थानमधील हा पहिला सामना आहे. आजचा सामना कोलकाताच्या होम ग्राऊंडवर आहे. त्यामुळे कोलकाताचं पारडं जड आहे. अशातच गेल्या काही सामन्यांत मिळालेल्या बॅक टू बॅक विजयांमुळे केकेआरचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ मात्र काहीसा चिंतेत आहे. मागच्या पाच सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात राजस्थानला विजय मिळवता आला आहे.
मागील तीन सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता. मागील सामन्यात 214 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता. युवा नीतीश राणाच्या नेतृत्वातील कोलकाता संघ सध्या दमदार फॉर्मात आहे. मागील दोन्ही सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात कोलकात्याने पंजाबचा पाच विकेटने पराभव केला होता. खेळपट्टी पाहा दोन्ही संघात महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. पाहूयात दोन्ही संघाची संभावित प्लेईंग 11
KKR vs RR संभावित प्लेईंग 11
कोलकाता नाइट रायडर्सची संभावित प्लेईंग 11
जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती
राजस्थान रॉयल्स संभावित प्लेईंग 11
यशस्वी जायसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, ए मेकॉय
महत्त्वाच्या इतर बातम्या :
KKR vs RR : संजू सॅमसनपुढे नीतीश राणाचे आव्हान, पाहा कोलकाता-राजस्थानची संभावित प्लेईंग 11