KKR vs LSG, IPL 2022: लखनौच्या संघात तीन तर, कोलकाताच्या संघात एक बदल; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
KKR vs LSG Toss Report: आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून कोणता संघ जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
KKR vs LSG Toss Report: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 66 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून कोणता संघ जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
लखनौ- कोलकाताच्या संघातील बदल
दरम्यान, कोलकाताविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघान तीन बदल केली आहेत. लखनौनं क्रुणाल पांड्या, आयुष बदोनी आणि दुष्मंता चमिराला विश्रांती दिली आहे. त्यांच्या ऐवजी मनन वोहरा, एव्हिन लुईस आणि कृष्णप्पा गौथमला संधी देण्यात आली आहे. तर, दुखापतीमुळं कोलकात्याचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अभिजीत टोमरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आयपीएल 2022 मधील अखेरचा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर याजंट्स हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील आपपला अखेरचा सामना खेळणार आहेत. दरम्यान, प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघ लखनौशी भिडणार आहे. लखनौनं 13 पैकी 8 सामने जिंकत 16 गुणांसह तिसंर स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे कोलकात्यानं 13 पैकी 6 सामनेच जिंकल्यानं 12 गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन:
व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकिपर), रिंकू सिंह, आंद्रे रसल, सुनील नरायण, उमेश यादव, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.