KKR vs GT Playing 11 : गुजरात आणि कोलकाता आमने-सामने, नितीश राणाच्या पलटनविरोधात पांड्याचे 'हे' 11 गडी मैदानात
IPL 2023 Match 37, GT vs KKR : आज कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे.
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज, 29 एप्रिलला पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. सलग चार पराभवांनंतर कोलकाता संघाने मागील सामन्यात बंगळुरु संघाचा पराभव केला. तर गुजरात संघाने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.
IPL 2023, GT vs KKR : गुजरात आणि कोलकाता आमने-सामने
शनिवारी कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात आणि नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल गुणतालिकेत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर तर कोलकाता सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील. आज नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) सामन्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स (GT) दोन सामन्यांमधील सलग विजयानंतर आजच्या सामन्यात विजय मिळवू हॅटट्रीक मिळवण्याचा प्रयत्न करेल.
These player meet-ups are always a sweet sight! 🫶@imShard | @hardikpandya7 | #KKRvGT | #AmiKKR | #TATAIPL pic.twitter.com/WpFfoNVw9L
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 28, 2023
Eden Gardens Pitch Report : ईडन गार्डनची खेळपट्टी कशी आहे?
आज गुजरात आणि केकेआर यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची (Eden Gardens) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.
KKR vs GT, Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
KKR Probable Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स
एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसी, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :