KKR vs GT Match Preview : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी काय सांगते
GT vs KKR Match Prediction : आयपीएल 2023 च्या आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
IPL 2023 KKR vs GT Match Prediction : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) आज 39 वा सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील विजयानंतर आज मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेत गुजरात संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर, कोलकाता संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आजचा सामना जिंकून विजयी मोहिम कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
IPL 2023, GT vs KKR : कोलकाता विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड?
कर्णधार हार्दिक पांड्यांच्या नेतृत्वात गुजरात संघाने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा 55 धावांनी पराभव केला. तसेच नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताने बंगळुरुचा 21 धावांनी पराभव केला. कोलकाता संघाचा त्याआधीच्या चार सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे संघ आजच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. गुजरात संघाने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर, कोलकाता संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.
IPL 2023, KKR vs GT : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे. गुजरात आणि कोलकाता संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. आज आयपीएलमध्ये या दोन्ही संघातील तिसरा सामना पाहायला मिळणार आहे.
KKR vsGT, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
कोलकाता (KKR) आणि गुजरात (GT) यांच्यात 29 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :