IPL Mumbai Indians Playing 11 : मुंबईकडून सलामीला हिटमॅनसोबत कोण? रोहितने स्वत: दिलं उत्तर
Mumbai Indians Squad 2022: सर्वाधिक आयपीएलचे खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या ऑक्शनमध्ये काही दमदार खेळाडू संघात घेतले असून आता त्यांचे अंतिम 11 कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Mumbai Indians : आगामी आयपीएलसाठी सर्व 10 संघ सज्ज झाले असून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघदेखील कसून सराव करत आहे. दरम्यान यंदा संघाने त्यांचा महत्त्वाचा खेळाडू आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक याला पुन्हा विकत न घेतल्याने सलामीला कोण? असा प्रश्न सर्वच फॅन्सना पडला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वत: याचं उत्तर दिलं असून त्याच्यासोबत यंदा सलामीला युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन मैदानात उतरणार आहे. रोहितने नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिली.
मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. त्यामुळे ईशान किशनला यंदा मुंबईने तब्बल 15.25 कोटी देत आपल्या ताफ्यात सामिल केलं. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. दरम्यान मुंबईचा यंदाची प्लेयिंग 11 कशी असून शकते यावर एक नजर फिरवू...
मुंबईची संभाव्य अंतिम 11
रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, डेवाल्ड ब्रेविस, अनोलप्रीत सिंह, टीम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, टिमल मिल्स, जयदेव उनाडकट, मुरुगन आश्विन
मुंबई इंडियन्स संपूर्ण संघ
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), फॅबियन अॅलन (75 लाख), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख), रमनदीप सिंह (20 लाख), राहुल बुद्धी (20 लाख), ऋतिक शौकीन (20 लाख), आर्यन ज्युयल (20 लाख), अनोलप्रीत सिंह (20 लाख).
हे ही वाचा-
IPL 2022 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू
IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा
LSG signs Andrew Tye: लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha