एक्स्प्लोर

IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा

RCB captain : आतापर्यंत झालेल्या 14 आयपीएल स्पर्धेत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीचा संघ फायनलपर्यंत पोहोचला होता.

RCB captain : आरसीबी (RCB) हा आयपीएलच्या इतिहासातील एक तगडा संघ असूनही एकदाही त्यांना चषक जिंकता आलेला नाही. तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या आरसीबी यंदातरी ट्रॉफी उचणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे. स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराटने यंदा कर्णधार राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा आरसीबीचं कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डु प्लेसिस याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. पण पुढील वर्षी पुन्हा विराट आरसीबीचा कर्णधार होणार असा दावा स्टार फिरकीपटू आर आश्विनने केला आहे.

आश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेवर बोलत असताना याबाबतचं वक्तव्य केलं. आश्विन म्हणाला,''फाफचं करीयर पाहता तो आणखी दोन ते तीन वर्षच आयपीएल खेळेल. त्यामुळे त्याला कर्णधार बनवून आरसीबीने चांगला निर्णय़ घेतला आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईलच. पण पुढील वर्षी पुन्हा विराट कर्णधार म्हणून संघात येऊ शकतो. कारण विराटवर मागील काही वर्षात तणाव असल्यामुळे त्याला हे वर्ष जणू विश्रांती प्रमाणे आहे. त्यामुळे तो पुढील वर्षी नव्या जोमाने पुन्हा कर्णधार बनू शकतो.

फलंदाजी क्रमवारीवरुन आरसीबी संभ्रमात 

लिलावात आरसीबीने अनेक दर्जेदार खेळाडूंना खरेदी केले आहे. पण नेहमीप्रमाणेच  संघ व्यवस्थापन फलंदाजीच्या क्रमवारीवरुन संभ्रमात आहे. विराट कोहली पुन्हा सलामीला येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विराट कोहली सलामीला आल्यास दुसऱ्या क्रमांकावर कुणाला संधी द्यायची, ही आरसीबीसाठी डोकेदुखी ठरु शकते. युवा अनुज रावत आणि फाफ डु प्लेसिस सलामीला येऊ शकतात. विराट तिसऱ्या आणि मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर येऊ शकतात. पाचव्या क्रमांकावर कार्तिक आणि सहाव्या क्रमांकावर महिपाल लोमरोर यांना संधी दिली जाऊ शकते.  मागील काही आयपीएलमध्ये आरसीबीला संघाचं संतुलन साधण्यात अपयश आले होते. दर्जेदार खेळाडू असतानाही कुणाला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं, हे न सुटलेलं कोडं आहे.

आरसीबीचा यंदाचा संघ :

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेजलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन एलेन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीत सिसोदिया, डेविड विली

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget