Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Baramati NCP VS NCP : बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी चा तिसरा अंक आता पाहायला मिळणार आहे. पहिला अंक लोकसभेच्या वेळी दुसरा विधान नगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. एकूण नगरसेवकाच्या ४१ जागांसाठी तर नगराध्यक्षाची एक जागा अशा एकूण ४२ जागांसाठी मतदान होणार असून प्रत्येकाने निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे.
कुठे युती, कुठे आघाड्या आणि कुठे एकला चलो रेचा नारा घुमत असताना बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी तिहेरी फाइट रंगणार आहे... राज्यातल्या काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मनोनिलन झालं असलं तरी पवारांच्या घरच्या मैदानात मात्र ते एकमेकांच्या विरोधात उतरलेत... विधानसभेतल्या पवार विरुद्ध पवार सामन्याची पुनरावृत्ती नगरपरिषदेतही होतेय... पण यावेळी अजितदादांचे पुतण्या युगेंद्र पवार स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नाहीत... पण अजितदादांवर हल्लाबोल करण्याची संधी मात्र ते सोडत नाहीयत... तर विकासाच्या झंझावाताचं आश्वासन देत अजितदादा मतांची मागणी करतायत...
All Shows


































