एक्स्प्लोर

Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान

Para National Swimming Championship : हैदराबाद येथे पार पडलेल्या नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रिया पाटीलने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत तीन सुवर्ण आणि सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला आहे.

मुंबई : हैदराबाद येथे सुरू असलेल्या 25 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये (Para National Swimming Championship) कोल्हापूरच्या रिया पाटीलने (Riya Patil) तीन सुवर्ण पटकावत धडाकेबाज कामगिरी केली. तसेच या स्पर्धेतील 'ज्युनियर प्लेअर ऑफ टुर्नामेंट' बहुमानही तिने पटकावला. या स्पर्धेत पदकतालिकेत कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

रिया पाटीलने S-5 ज्युनिअर कॅटेगरीमध्ये पहिल्या दिवशी 100 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पटकावत महाराष्ट्राचे खाते उघडले. दुसऱ्या दिवशीही तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावलं.

रिया पाटील हिने सुरुवातीला 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये अप्रतिम कामगिरी करत महाराष्ट्रासाठी पहिले पदक जिंकले. ही कामगिरी तिने 3.12 मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने कामगिरीमध्ये सातत्य ठेवत सलग दुसरे सुवर्णपदक नावावर केलं. 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकार तिने 1.42 मिनिटे इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण केला.

Riya Patil Kolhapur : महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी

हैदराबाद येथे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 25 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत देशभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये रिया पाटीलने अभिमानास्पद कामगिरी करत महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे नाव उंचावले.

रिया पाटीलने विक्रम वेळेसह ही तीनही सुवर्ण जिंकली आहेत. तसेच गुवाहाटी आणि दिल्लीमध्ये तिने या आधी नोंदवलेले स्वतःचे राष्ट्रीय विक्रमही तोडले आहेत. त्यामुळे रिया पाटीलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Riya Patil Swimming Record : कामगिरीमध्ये सातत्य

रिया पाटीलने तिच्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवल्याचं दिसून येतंय. गेल्या वर्षी गोव्यामध्ये झालेल्या 24 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने तीन सुवर्ण पटकावल होत. 10 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात रियाने सुवर्ण पटकावल होत.

त्या आधी, 2023 साली गुवाहाटी येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत चकमदार कामगिरी करत तीन सुवर्णांसह बेस्ट स्विमरचा पुरस्कार पटकावला होता. तसेच दिल्ली येथे झालेल्या पहिल्या CPSFI स्पर्धेत रियाने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदक पटकावले होते.

रिया पाटील ही कोल्हापूरची खेळाडू असून ती सध्या सदर बाजार येथील सागर पाटील जलतरण तलाव या ठिकाणी प्रॅक्टिस करते. रियाला कोल्हापूर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे विनायक सुतार, प्रशिक्षक अमर पाटील, अस्मिता म्हाकवे आणि काशीनाथ भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

D Y Patil passes away: मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मोठी बातमी: शिक्षणमहर्षी डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget