IPL 2022 Prize Money : गुजरात टायटन्सच्या खिशात 20 कोटी, दमदार प्रदर्शनासाठी खेळाडूंवरही पैशांचा पाऊस, वाचा कोणी मिळवली किती रक्कम?
IPL 2022 : गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2022 चा खिताब जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर राजस्थान रॉयल्सला उपविजेतापद मिळालं आहे.
IPL 2022 Gujarat Titans Won Final Match : आयपीएलच्या 15 (IPL 2022) व्या हंगामाची अखेर सांगता झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) 7 विकेट्सनी मात देत विजयश्री मिळवला आहे. दरम्यान आयपीएलचा खिताब जिंकल्याबद्दल विजेत्या गुजरात संघाला तब्बल 20 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं आहे. तर उपवे मिळणार तर उपविजेत्या राजस्थान संघाला 13 कोटींची रक्कम मिळाली आहे. सीव्हीसी कॅपिटल्सने गुजरात फ्रेंचाइजीला 5625 कोटी रुपयात खरेदी केले होतं, ज्यानंतर पदार्पणाच्या हंगामातच गुजरातने विजय मिळवत कमाल कामगिरी केली आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबी संघाला 7 कोटीं रुपये तर लखनौ संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालं आहे.
विजेत्या संघाला मिळालेल्या रकमेंसह हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील बक्षिस यावेळी वाटप करण्यात आलं आहे. तर हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदा या दोन्ही कॅप्स राजस्थान रॉयल्सकडेच राहिल्या आहेत. जोस बटलरने तब्ब 863 धावा कर ऑरेंज कॅप तर युजवेंद्र चहलने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली आहे. दरम्यान या अप्रतिम कामगिरीसाठी दोघांनाही प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षिस मिळाले आहे.
याशिवाय जोस बटलर याने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे त्यासला मोस्ट व्हॅलुएबल प्लेयर ऑफ द सीजनचा खिताबही मिळाला आहे. ज्यासाठी त्याला 12 लाख रुपयांचं बक्षिस मिळालं आहे. त्याच्या खात्यावर 387.5 पॉइंट्स असून या यादीत हार्दिक दुसऱ्या स्थानावर आहे त्याच्या खात्यावर 284.5 पॉइंट्स आहेत. सर्वाधिक म्हणजे 45 षटकारही बटलरने ठोकल्याने क्रॅक इट सीक्सेज ऑफ द सीजनचं बक्षीसही त्यालाच मिळणार असून यासाठी आणखी 12 लाख त्याला मिळती. याशिवाय आजच्या सामन्यात लॉकी फर्ग्यूसनने 157.3 kmph च्या वेगाने चेंडू फेकला हा हंगामातील सर्वात वेगवान चेंडू असल्याने त्यालाही 10 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले आहे. तर तुफान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकला इमरजिंग प्लेयर ऑफ द सीजनचा खिताब देत 20 लाख रुपये दिले आहेत.
इतर पुरस्कार...
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन : 15 लाख रुपये
पॉवर प्लेयर ऑफ द सीजन: 12 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ द सीजन: 12 लाख रुपये
हे देखील वाचा-