IPL 2023 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीची उडी, 'या' गोलंदाजाने चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, शर्यतीतील टॉप 5 यादी
IPL 2023 Orange & Purple Cap : आयपीएलच्या 16 व्या हंगामात (IPL 2023) 21 व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) दोन गडी पराभव केला.
IPL 2023 Orange & Purple Cap : आयपीएलच्या 16 व्या हंगामात (IPL 2023) 21 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघाने लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) दोन गडी पराभव केला. लखनौच्या (LSG) एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने बाजी मारली. पंजाबने लखनौला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केलं. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 160 धावांचे लक्ष्य दिले होतं. हे लक्ष्य पंजाबने शेवटच्या षटकात पूर्ण केलं आणि सामना खिशात घातला.
पंजाबच्या विजयानंतर गुणतालिकेत पुन्हा बदल झाला आहे. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीतही बदल झाला आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहलीही सामील झाला आहे. तर आधी चहलकडे असलेली पर्पल कॅप दुसऱ्या खेळाडूकडे गेली आहे.
ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, शर्यतीतील टॉप 5 खेळाडूंची यादी
Orange Cap : ऑरेंज कॅप
दुखापतीमुळे शिखर धवन लखनौ विरुद्धचा सामना खेळू शकला नाही, पण तरीही धवन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याने चार सामन्यांमध्ये 233 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा फलंदाज आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नर असून त्या 228 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता विराट कोहलीनंही झेप घेतली आहे. तो या यादीत 214 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वात जास्त धावा करणारे टॉप 5 फलंदाज
- शिखर धवन : 233 धावा
- डेव्हिड वॉर्नर : 228 धावा
- विराट कोहली : 214 धावा
- जोस बटलर : 204 धावा
- फाफ डू प्लेसिस : 197 धावा
Purple Cap : पर्पल कॅप
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये लखनऊचा मार्क वुड पहिल्या क्रमांकावर आहे. आधी चहलकडे असलेली पर्पल कॅप आता वुडकडे गेली आहे. त्याने 4 सामन्यात 11 गडी बाद केले आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉप 5 गोलंदाज
- मार्क वुड : 11 विकेट्स
- युझवेंद्र चहल : 10 विकेट्स
- राशिद खान : 9 विकेट्स
- रवी बिशोई : 8 विकेट्स
- अर्शदीप सिंह : 8 विकेट्स
महत्त्वाच्या इतर बातम्या :