IPL 2023 : पंजाबचा विजय, चर्चा मात्र केएल राहुलच्या कॅचची! लांब डाईव्ह करत पकडला झेल, दमदार फिल्डींगचा Video व्हायरल
LSG vs PBKS : लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने अप्रतिम झेल घेतला. राहुलने लांब डाईव्ह घेत ही कॅच घेतली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
KL Rahul Catch Video : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शनिवारी (13 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पंजाब किंग्सकडून पराभव स्वीकारावा लागला. पंजाबने दोन गडी राखून हा सामना जिंकला. मात्र पराभवानंतरही लखनौचा कर्णधार केएल राहुल याची सध्या चर्चा आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलनं शानदार अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच त्याची बॅट तळपताना पाहायला मिळाली. यासोबतच त्याने संघासाठी फिल्डींग करताना डाईव्ह करत एक उत्तम झेल पकडला. याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल आहेत आहे.
LSG vs PBKS : पंजाबचा विजय, चर्चा मात्र केएल राहुलच्या कॅचची
पंजाब विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकात 8 विकेट गमावत 159 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने तीन चेंडू आणि दोन गडी शिल्लक असताना लक्ष्य गाठलं आणि सामन्यात विजय मिळवला. लखनौ संघाचा या सामन्यात पराभव झाला, पण संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या एका शानदार झेलने सर्वांचं लक्ष वेधलं.
केएल राहुलने लांब डाईव्ह घेत शानदार झेल घेतला
दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुलने १६व्या षटकात एक झेल पकडला. लखनौच्या डावातील हे षटक वेगवान गोलंदाज मार्क वुड टाकत होता. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर राहुलने हा झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पंजाब किंग्जचा फलंदाज जितेश शर्माने गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या जवळ पोहोचला. डायव्हिंग करत राहुलने हा झेल स्वतःचा बनवला. राहुलचा हा झेल बघता बघता घेतला जात होता. या झेलद्वारे जितेश शर्मा 4 चेंडूत 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पाहा व्हिडीओ :
That catch has 𝙆𝙇𝘼𝙎𝙎 written all over it!
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
Superb piece of athleticism from the @LucknowIPL skipper 🫡
Follow the match ▶️ https://t.co/OHcd6VfDps #TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/kDdPK1SEE0
पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय
आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 21 व्या सामन्यात पंजाबने लखनौचा दोन विकेटने पराभव केला. लखनौने दिलेले 160 धावांचे आव्हान पंजाबने दोन विकेट राखून पार केले. अटीतटीच्या लढतीत पंजाबकडून सिकंदर रजा याने अर्धशतकी खेळी केली. तर शाहरुख खान याने फिनिशिंग टच दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :