Team India Next Cricket Schedule: न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपली; आता रोहित-विराट पुन्हा मैदानात कधी दिसणार?, संपूर्ण Schedule
Team India Next Cricket Schedule: विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत.

Team India Next Cricket Schedule: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंदूरमध्ये तीसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत आणि न्यूझीलंडची 1-1 अशी बरोबरी होती. त्यामुळे तीसरा अंतिम सामना निर्णायक होता. या निर्णयाक सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 41 धावांनी पराभव करुन मालिका 2-1 ने जिंकली. आतापर्यंतच्या इतिहासात भारतात टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकली. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. रोहित शर्माला विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरी करत एक शतकही झळकावले.
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. दरम्यान, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा कधी टीम इंडियाकडून एकदिवसीय सामने खेळणार, याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी आता टीम इंडियाकडून तब्बल 6 महिन्यानंतर खेळताना दिसेल.
सहा महिन्यानंतर रोहित-विराट पुन्हा टीम इंडियाकडून खेळणार- (Virat Kohli-Rohit Sharma)
एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर टी-20 विश्वचषक आणि आयपीएल 2026 चा हंगाम सुरु होईल. परिणामी, रोहित आणि विराट पुढील सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहतील. विराट कोहली आणि रोहित शर्मा या काळात आयपीएलमध्ये त्यांच्या संबंधित फ्रँचायझींसाठी खेळतील, तर त्यांचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून होईल. भारतीय संघाचे जून ते डिसेंबर दरम्यान 15 एकदिवसीय सामने नियोजित आहेत, ज्यात अफगाणिस्तानविरुद्ध तीन, इंग्लंडविरुद्ध तीन, वेस्ट इंडिजविरुद्ध तीन, न्यूझीलंडविरुद्ध तीन आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामने आहेत. त्यामुळे रोकोची जोडी आता टीम इंडियाकडून तब्बल 6 महिन्यानंतर खेळताना दिसेल.





















