मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
महापौर निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक गैरहजर होऊन भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गटाला काठावरचं बहुमत मिळाल्याने महापौरपदाचा पेच मात्र भलताच वाद चालला आहे. शिंदे आणि भाजपमध्ये एकमेकांवर वार पलटवार आणि जोरदार रस्सीखेच महापौरपदावरून सुरू झाला आहे. त्यामुळे आता आपण महापौर भाजपचा होणार की शिंदेंना संधी दिली जाणार? याबाबत मात्र चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे ही चर्चा असतानाच दुसऱ्या बाजूने भाजपने बॅक डोअर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची बातमी एका दैनिकात छापून आल्यानंतर शिंदे यांचा गेम करण्याचा प्रयत्न आहे का? अशी सुद्धा चर्चा आहे. मात्र, या सर्व चर्चांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. या प्रकारच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी चर्चा फेटाळल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मुंबई महापौर पदावरून चर्चा झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली आहे. मात्र, कुठलीही चर्चा झाली नसल्याचा उद्धव ठाकरे यांच्याकडून खुलासा करण्यात आला. महापौर निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक गैरहजर होऊन भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आमची कुठलीही चर्चा झाली नाही
दुसरीकडे, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमची कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या सगळ्या बातम्या वृत्तपत्रांमधील आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही, असं राऊत यांनी सांगितलं. महापौर कोणाला करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील, असाही संजय राऊत यांनी टोला लगावला. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आकडे आले आहेत त्यानुसार भाजपने विजय साजरा करण्याचा प्रयत्न केला तरी तो विजय नाही असे ते म्हणाले. शिंदेंना महापौर पदासाठी दिल्लीतून चावी दिली जात आहे. मात्र, मुंबईत भाजपने विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत असेही राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईचा निकाल लागल्यानंतर लगेचच नवनियुक्त नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी थेट हॉटेलमध्ये ठेवल्याने सुद्धा राजकीय चर्चांना उत आला आहे. इतकेच नव्हे, तर काही नगरसेवक ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















