1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर आता OTT वर, क्लायमॅक्स पाहून थरकाप उडेल!
अवघ्या 1 तास 35 मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट सायकोलॉजी, मिस्ट्री आणि क्राइमचा जबरदस्त खेळ दाखवणारा आहे.

Netflix psychological thriller: सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट म्हटले की सस्पेन्स, रहस्य आणि तीव्र उत्कंठा हमखास असते. काही चित्रपटांमध्ये तर सस्पेन्स इतका जबरदस्त असतो की प्रेक्षकांची नजर स्क्रीनवरून हटतच नाही. नुकतीच OTT वर प्रदर्शित झालेली हॉलीवूड सायकोलॉजिकल थ्रिलर ‘बोन लेक’ (Bone Lake) याच प्रकारात मोडणारी आहे. (Netflix thriller)
मर्सिडीज ब्राइस मॉर्गन दिग्दर्शित या अमेरिकन एरोटिक थ्रिलरमध्ये मॅडी हॅसन, अॅलेक्स रो, अँड्रा नेचिता आणि मार्को पिगोसी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा जोशुआ फ्रीडलँडर यांनी लिहिली असून, अवघ्या 1 तास 35 मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट सायकोलॉजी, मिस्ट्री आणि क्राइमचा जबरदस्त खेळ दाखवणारा आहे.
काय आहे ‘Bone Lake’ ची कथा?
‘बोन लेक’ OTT वर येण्यापूर्वी 3 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याआधी 2024 मध्ये Fantastic Fest मध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. कथानक एका कपलभोवती फिरते, जे सुट्टी घालवण्यासाठी एका लेकसाइड कंट्री हाऊसमध्ये जातात. तिथे त्यांची भेट दुसऱ्या एका कपलशी होते. हा बंगला त्यांनी फक्त स्वतःसाठी बुक केलेला असतो, मात्र नंतर तो डबल बुक झाल्याचे समजते. परिस्थितीमुळे दोन्ही कपल एकाच घरात राहण्यास तयार होतात. पण हा निर्णय त्यांच्या आयुष्यात किती भयानक वळण घेणार आहे, याची त्यांना कल्पनाही नसते. सुरुवातीला सगळं काही सामान्य आणि शांत वाटतं. मात्र जसजसा वेळ पुढे सरकतो, तसतसे या चार जणांमधील नातेसंबंध, रहस्ये आणि मानसिक ताण उघड होत जातो. विश्वासघात, संशय आणि भीती यांचा खेळ सुरू होतो आणि कथा हळूहळू भयंकर वळण घेते. पुढील घडामोडी रक्तरंजित, धक्कादायक आणि पूर्णपणे अनपेक्षित आहेत.
‘Bone Lake’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
सिनेमागृहात हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला होता. आता तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा सायकोलॉजिकल थ्रिलर OTT वर दाखल झाला आहे. जर तुम्ही अजून ‘Bone Lake’ पाहिला नसेल, तर हा चित्रपट तुम्ही Netflix या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.























