KL Rahul, IPL : राहुलचा आयपीएलमध्ये भीमप्रकारम, विराट-रोहितलाही न जमलेला विक्रम केला
KL Rahul, IPL : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सचं आयपीएलमधील आव्हान एलिमेनटर सामन्यात संपुष्टात आलेय.
KL Rahul, IPL : राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सचं आयपीएलमधील आव्हान एलिमेनटर सामन्यात संपुष्टात आलेय. आरसीबीने लखनौचा पराभव करत क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. आरसीबीने प्रथम फंलदाजी करताना चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल लखनौचा संघ सहा गड्यांच्या मोबदल्यात 193 धावांपर्यंत पोहचला.. त्यासह 14 धावांनी लखनौचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने (kl rahul) 58 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यासह राहुलने यंदाच्या हंगामात 15 सामन्यात 616 धावा केल्या.
राहुलची कामगिरी -
यंदाच्या हंगामात राहुलने 600 पेक्षा जास्त धावा करत विक्रमाला गवसणी घातली आहे. राहुलने 2022 शिवाय 2021 मध्ये 626, 202मध्ये 670 आणि 2018 मध्ये 659 धावा केल्या होत्या.. आयपीएलमध्ये चार हंगामात 600 पेक्षा जास्त धावा करणारा राहुल एकमेव खेलाडू झालाय... रोहित शर्मा अथवा विराट कोहली यांनाही हा विक्रम करता आलेला नाही.. राहुलने डेविड वॉर्नर आणि क्रिस गेल यांनाही पाटीमागे सोडलेय.
या खेळाडूंच्या नावावरही विक्रम -
युनिवर्स बॉस ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर यांनी आयपीएलच्या तीन हंगामात 600 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. या यादीत 42 वर्षीय ख्रिस गेलने लागोपाठ तीन हंगामात सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 2011 ते 2013 यादरम्यान गेलने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर 2016 ते 2019 यादरम्यान तीन हंगामात वॉर्नरने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्यात.
राहुलचं आयपीएलमधील प्रदर्शन -
आयपीएल 2022: 616 धावा
आयपीएल 2021: 626 धावा
आयपीएल 2020: 670 धावा
आयपीएल 2019: 593 धावा
आयपीएल 2018: 659 धावा