IPL Final: आयपीएलच्या समारोप सोहळ्यात चमकणार बॉलिवूड तारे; कार्यक्रमाची वेळ, प्रमुख पाहुण्यांची यादी आणि इतर माहिती
अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स आणि राजस्थान (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
IPL Final, GT vs RR: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स आणि राजस्थान (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात आज आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी समारोप सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. या समारोप सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि संगीतकार एआर रेहमान (A. R. Rahman) यांच्याशिवाय क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी आणि आयसीसीचे अधिकारी यात सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील (Amit Shah) उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेटचा प्रवास
आयपीएल 2022 च्या समारोप सोहळा 45 मिनिटांचा असेल. मंडळानं आपल्या संस्थेची जबाबदारी एका एजन्सीवर सोपवली आहे. या समारोप सोहळ्यात भारतीय क्रिकेटचा प्रवासही दाखवला जाणार आहे. यादरम्यान, बॉलिवूड स्टार आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच करण्यात येणार आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान भारतीय टेलिव्हिजनवर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
समोरोप सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
सौरव गांगुली काय म्हणाले?
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका वेबसाइटला सांगितलं की, "या कार्यक्रमात भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिनही साजरा केला जाईल. भारतीय क्रिकेटनं गेल्या 7 दशकात केलेल्या प्रवासावरही या कार्यक्रमात लक्ष दिलं जाईल. अहमदाबादमधील अंतिम सामन्यामुळं आम्ही आनंदोत्सव साजरा करू. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याचा भारतीय क्रिकेटचा प्रवास एका खास शोद्वारे दाखवला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे."
हे देखील वाचा-
- IPL 2022 Final, GT vs RR: अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल असेल खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट
- हार्दिक पांड्या- संजू सॅमसन आमने-सामने, इतिहास रचण्यासाठी उतरणार मैदानात, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?
- IPL 2022 Final: आयपीएलमधील महामुकाबला आज; कधी, कुठे पाहाल गुजरात- राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना?