हार्दिक पांड्या- संजू सॅमसन आमने-सामने, इतिहास रचण्यासाठी उतरणार मैदानात, अशी असू शकते दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन?
GT vs RR Probable XI: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत आहे.
GT vs RR Probable XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (Gujarat Titans vs Rajasthan Royals) आज (29 मे) खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान, आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी गुजरात- राजस्थान मैदानात उतरणार आहे. तर, दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते? यावर एक नजर टाकुयात.
आयपीएल 2022 समारोप सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे. एआर रहमान आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकतात.
आतापर्यंत कोणत्या संघानं किती ट्रॉफी जिंकल्या?
दरम्यान, मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर कोलकात्याचा क्रमांक लागतो. कोलकात्यानं आतापर्यंत दोनदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यानंतर डेक्कन चार्ज हैदराबाद आणि सनरायसर्स हैदराबाद दोन्ही संघानं प्रत्येकी एक-एक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात शेन वार्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघानं आयपीएलची ट्रॉफी उचलली.
गुजरात टायटन्ससाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार विकेटकिपर), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेडे मेकॉय, युझवेंद्र चहल.
हे देखील वाचा-