एक्स्प्लोर

IPL 2022 Final, GT vs RR: अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल असेल खेळपट्टी? पाहा पिच रिपोर्ट

IPL 2022 Final, GT vs RR:  आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांसमोर येणार आहेत.

IPL 2022 Final, GT vs RR:  गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (Gujarat Titans vs Rajasthan Royals) आज आयपीएल 2022 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहेत. अंतिम सामन्यात दवाचा प्रभाव जाणवणार? कोणासाठी अनुकूल  खेळपट्टी असेल? हे जाणून घेण्यासाठी पिच रिपोर्ट (Pitch Report) आणि हवामानाचा अंदाज (Weather Forecast) जाणून घेऊयात.

वेगवान गोलंदाजांना मदत
स्टेडियममध्ये पाच काळ्या मातीच्या आणि सहा लाल मातीच्या खेळपट्ट्या आहेत. लाल मातीच्या खेळपट्ट्यांपेक्षा काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर चांगला बाऊन्स मिळतो. काळ्या मातीच्या खेळपट्ट्या लवकर सुकतात आणि फिरकीपटू किंवा संथ गोलंदाजांना मदत करतात. क्वालिफायर 2 मध्ये हे दिसले नसले तरी येथे वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर धावा करणं खूप सोपं आहे. चांगली खेळपट्टी आणि वेगवान आउटफिल्ड म्हणजे फलंदाज काही चांगले फटके खेळू शकतात.

अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज
अहमदाबादमध्ये रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस असू शकते. तर, किमान तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील आणि रात्री तापमानात घट होऊ शकते. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका नाही. परंतु, येथे ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मुंबई इंडियन्सनं सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर कोलकात्याचा क्रमांक लागतो. कोलकात्यानं आतापर्यंत दोनदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यानंतर डेक्कन चार्ज हैदराबाद आणि सनरायसर्स हैदराबाद दोन्ही संघानं प्रत्येकी एक-एक वेळा ट्रॉफी जिंकली आहे. तर, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात शेन वार्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघानं आयपीएलची ट्रॉफी उचलली होती. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget