IPL Auction 2024 : मिचेल स्टार्क IPL हंगामातील आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू, सॅम करन, कॅमरुन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांचा रेकॉर्ड काढला मोडीत
IPL Auction 2024 : मिचेल स्टार्कने आयपीएल 2024 च्या लिलावात मागील सर्व खेळाडूंचे रेकॉर्ड मोडले आहेत. कोलकात्याच्या संघाने या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली आहे.
![IPL Auction 2024 : मिचेल स्टार्क IPL हंगामातील आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू, सॅम करन, कॅमरुन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांचा रेकॉर्ड काढला मोडीत IPL Auction 2024 Mitchell Starc has broken all previous player records in the IPL 2024 auction including Sam Curran Cameron Green Ben Stokes detail marathi news IPL Auction 2024 : मिचेल स्टार्क IPL हंगामातील आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू, सॅम करन, कॅमरुन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांचा रेकॉर्ड काढला मोडीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/19/7d82539a7f906b245408656cdbba65951702984996849720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा (Australia) खेळाडू मिचेल स्टार्कने (mitchell starc) आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. कोलकात्याने (Kolkata) स्टार्कसाठी 24.75 कोटींची ऐतिहासिक बोली लावून या खेळाडूला खरेदी केले आहे. यामुळे मिचेल स्टार्क आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या खेळाडूने इंग्लंडचा सॅम करन (Sam Curran), ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन (Cameron Green ), इंग्लंडचा बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिससह सर्व जुन्या महागड्या खेळाडूंचे रेकॉर्ड मोडले आहेत.
मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली. मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले.
पॅट कमिन्स - सनरायझर्स हैदराबाद
लिलावात आले तेव्हा त्याची बोली 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर होती. पहिली बोली चेन्नई सुपर किंग्जने लावली आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सनेही या खेळाडूला खरेदी करण्यात रस दाखवला. त्यानंतर आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात स्पर्धा झाली आणि अखेर पॅट कमिन्सची बोली 20.5 कोटींवर थांबली. आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू कोण आहेत, ज्यांचा विक्रम पॅट कमिन्सने मोडला आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
सॅम करन - पंजाब किंग्स
आयपीएल 2023 च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. गेल्या वर्षीच्या लिलावात सॅम करन आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
कॅमरुन ग्रीन - मुंबई इंडियन्स
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमरुन ग्रीन आहे. या युवा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूला मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या लिलावात 17.50 कोटी रुपये देऊन त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. मात्र, यंदाच्या लिलावापूर्वी मुंबईने ग्रीनला आरसीबीला रोखीत व्यवहार केले होते.
बेन स्टोक्स - चेन्नई सुपर किंग्ज
इंग्लंडचा विश्वविजेता अष्टपैलू बेन स्टोक्सची अनेकवेळा मोठ्या किमतीत विक्री झाली आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात या वेगवान गोलंदाजाच्या नावावर अनेकदा मोठ्या बोली लावल्या गेल्या आहेत. पण सर्वात मोठी बोली आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने लावली होती. चेन्नईच्या संघाने 2023 मध्ये बेन स्टोक्सला 16.25 कोटींना खरेदी केले होते.
क्रिस मॉरिस - दक्षिण आफ्रिका
या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस देखील आहे. ख्रिस मॉरिसचा राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2021 च्या लिलावात 16.25 कोटी रुपये देऊन त्यांच्या संघात सामील करुन घेतले.
हेही वाचा :
IPL Auction 2024 : स्मिथ, हेजलवूडसह दिग्गज अनसोल्ड, या दिग्गजांवर बोलीच नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)