IPL 2025 : हेनरिक क्लासेन साठी कायपण, हैदराबादनं विराट-रोहित, हार्दिक अन् सूर्यापेक्षा जास्त पैसे मोजले, सर्वात महाग खेळाडूंची यादी
Most Expensive Player In IPL 2025 Retention: सनरायजर्स हैदराबादनं दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हेनरिक क्लासेनला 23 कोटी रुपये मोजून रिटेन केलं.
Top-10 Most Expensive Player In IPL 2025 Retention मुंबई : आयपीएल 2025 पूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्वच संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादनं 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. सनरायजर्स हैदराबादनं दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनला 23 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे. याशिवाय विराट कोहली आणि निकोलस पूरन यांना देखील 21 कोटी रुपये खर्च करुन त्यांच्या फ्रँचायजीनं रिटेन केलं आहे.
हेनरिक क्लासेनला 23 कोटी, विराट अन् निकोलस पूरनला 21 कोटी
हेनरिक क्लासेनसाठी सनरायजर्स हैदराबादनं 23 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2024 च्या आयपीएलमध्ये हेनरिक क्लासेन चांगली फलंदाजी केली होती. हेनरिक क्लासेनसाठी हैदराबादनं खर्च केलेली रक्कम रिटेन्शनमधील सर्वाधिक ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं देखील विराट कोहलीला 21 कोटी रुपये खर्चून रिटेन केलं आहे. याशिवाय लखनौ सुपर जाएंटसनं निकोलस पूरनसाठी 21 कोटी रुपये मोजले आहेत.
पॅट कमिन्स ते यशस्वी जयस्वाल अनेकांना मिळाले 18 कोटी
गुजरात टायटन्सनं 18 कोटी रुपये खर्च करुन अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानला संघासोबत कायम ठेवलं आहे. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सवर काव्या मारननं विश्वास दाखवला आहे. त्याला देखील 18 कोटींमध्ये संघासोबत कायम ठेवण्यात आलं आहे. हैदराबादनं गेल्या आयपीएलमध्ये त्याला 20.5 कोटी रुपये मोजून संघात घेतलं होतं.
भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅसमन या दोघांना देखील राजस्थान रॉयल्सनं प्रत्येकी 18 कोटी रुपये खर्च करुन संघात कायम ठेवलं आहे. विशेष बाब म्हणजे राजस्थान रॉयल्सनं जोस बटलरला रिटेनं केलेलं नाही. मुंबई इंडियन्सनं संघात सर्वाधिक पैसे जसप्रीत बुमराहसाठी मोजले. मुंबईनं त्याला 18 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं रवींद्र जडेजा आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाडला प्रत्येकी 18 कोटी रुपयांचा खर्च करुन संघासोबत कायम ठेवलं आहे. सनरायजर्स हैदराबादनं सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांना देखील प्रत्येकी 14 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे.
मुंबई इंडियन्सनं देखील आयपीएल 2025 च्या रिटेन्शनसाठी 75 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. जसप्रीत बुमराहला 18 कोटी, सूर्यकुमार यादवला 13.35 कोटी, कॅप्टन हार्दिक पांड्याला 13.35 कोटी, रोहित शर्माला 13.30 कोटी आणि तिलक वर्माला 8 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे.
इतर बातम्या :