एक्स्प्लोर

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात सोमवारी देखील विक्रीचं सत्र सुरु होतं. गुंतवणूकदारांचे चार दिवसात 24.69 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

मुंबई : शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून चार दिवसांपासून सुरु असलेल्या विक्रीमुळं तब्बल गुंतवणूकदारांना 24.69 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. गुंतवणूकदारांसाठी सोमवार ब्लॅक मंडे ठरला. सोमवारी सेन्सेक्स 1048.90 अकांनी घसरला. यामुळं एकाच दिवसात 12.61 लाख कोटी रुपयांचं नुकसान गुंतवणूकदारांना सहन करावं लागलं. निफ्टी 345.55 अकांनी घसरुन 23085.95 अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांमध्ये सेन्सेक्स 2.39 टक्क्यांनी घसरला आहे. तर, रुपया निचांकी पातळीवर पोहोचला असून एका डॉलर 86.27 रुपये मोजावे लागतील.  

सेन्सेक्स घसरण्याची कारणं काय? 

आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचं सत्र जोरदार सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या तेल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकेत रोजगाराच्या मजबूत आकडेवारीमुळं व्याजदरातील कपातीची शक्यता कमी झाली आहे. यामुळं डॉलर मजबूत झाला असून त्याच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. जीडीपीच्या दरातील कमतरता आणि कमाई कमी झाल्यानं बाजारावर परिणाम झाला. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न राहण्याचा अंदाज यामुळं शेअर बजारात घसरण सुरु आहे. 

शेअर बाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीसह स्मॉल कॅप, मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. यामुळं छोट्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. 

डॉलर मजबूत होणं, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी त्यांचा पैसा भारतीय बाजारातून विक्री करुन काढून घेणं, डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्थिक धोरण याचा प्रभाव बाजाराच्या घसरणीमागं असल्याचं सांगण्यात येत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आणखी घसरण होईल, असं सांगण्यात येत आहे. 


कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज नुसार येत्या काही महिन्यांमध्ये लार्ज कॅप शेअर चांगली कामगिरी करु शकतात. तर, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये घसरण होऊ शकते. विदेशी गुंतवणूकदार संस्था भारतात गुंतवणूक करण्यास उत्सूक नसल्याचं चित्र आहे. 

अमेरिकेत मजबूत रोजगार रिपोर्टनं फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दर लवकर कमी केले जातील याबाबतच्या आशा कमी झाल्या आहेत. त्यामुळं डॉलर मजबूत झाला, बाँण्ड यील्ड वाढले. त्यामुळं भारतासारख्या उभरत्या मार्केटमधील तेजी कमी झाली. 

अमेरिकेतील सत्तांतराचा प्रभाव

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर कमला हॅरिस यांना पराभव स्वीकारावा लागला. येत्या 20 जानेवारीला जो बायडन यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष होतील. जो बायडन यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी कच्च्या तेलावर सॅक्शन्स लावल्यानं त्याचा परिणाम झाला आहे. क्रुड आईलचे दर 82 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले आहेत. याचा दबाव देखील भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. त्यामुळ शेअर बाजारात घसरण झाली. 

इतर बातम्या :

महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन! पण खरचं कर्जमाफी मिळणार का? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकरी संभ्रमात 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget