एक्स्प्लोर

Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?

Nashik Dwarka Flyover Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. यात आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झालाय.

Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात घडण्यापूर्वी पिकअपमधील एक तरुण आडगाव जवळ उतरल्याने त्याचा जीव वाचला. या तरुणाने माध्यमांशी संवाद साधताना एक धक्कादायक माहिती दिली आहे.

नाशिकमधील भीषण अपघाताच्या काही वेळा आधीच पिकअपमधून उतरलेल्या तरुणाचे विक्रांत ठाकूर असे नाव आहे.  विक्रांत ठाकूर म्हणाला की, रविवारी आम्ही सर्वजण धारणगावकडे चार वाहनांतून मार्गस्थ झालो होतो. सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही पुन्हा नाशिककडे निघालो. नाशिकच्या जवळ पोहोचताना ओढ्याचा टोल चुकविता यावा, याकरिता सय्यद पिंपरीमार्गे जाऊ, असे पिकअपमधील कुणीतरी बोलले. यावेळी मी म्हणालो की, टोलचे 135 रुपये मी देतो. पण आपण सरळच जाऊ. मात्र, टोल वाचविण्याकरिता त्यांनी पिकअप सय्यद पिंपरी मार्गे वळविला होता. तर चालक वाहनाचा वेग कमी करीत नव्हता. त्यामुळे मी आडगाव परिसरात त्या वाहनातून उतरलो. मी इतरांनाही दुसऱ्या वाहनातून जाऊ, असे म्हटले. मात्र, मुलांनी आता थोडेच अंतर जायचे आहे, जाऊ दे, असे म्हणत त्यांनी या पिकअपमधूनच प्रवास केला. काही वेळातच त्यांचा अपघात झाल्याची घटना घडली, असे त्याने म्हटले आहे. 

पिकअप छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे आला असता तर...

दरम्यान, निफाड-नाशिक थेट मार्ग असतानादेखील केवळ ओढ्याचा टोल चुकविण्यासाठी या तरुणांनी वाहन सय्यद पिंपरीमार्गे वळविले होते. टोल 135 रुपये वाचल्याचा आनंद या मुलांना मिळाला. मात्र पुढील काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले आणि सात जणांना आपला जीव गमवावा लागला. हा टेम्पो छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे आला असता, तर तो औरंगाबाद नाका येथे पोहोचला असता. येथून किमान द्वारका चौकापर्यंत तरी उड्डाणपुलावर चढण्याची संधी नसल्याने अपघात टळला असता, अशी चर्चा आता नाशिकमध्ये रंगली आहे. 

आणखी वाचा 

मोठी बातमी: नाशिकच्या द्वारका पूल अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट, मृतांचा आकडा वाढला, लोखंडी सळईंचा पुरवठादारही गोत्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget