IPL 2025 Auction : रोहित शर्माच्या शत्रूला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने उघडली तिजोरी! पाण्यासारखा पैसा केला खर्च अन्...
IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 मेगा लिलावात रेकॉर्डब्रेक बोली झाली.
IPL 2025 Auction Mumbai Indians : आयपीएल 2025 मेगा लिलावात रेकॉर्डब्रेक बोली झाली. काही खेळाडूंना अपेक्षेपेक्षा मोठ्या बोली लागल्या आहेत, तर काही फ्रँचायझी त्यांना स्वस्तात विकत घेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर बरीच बोली लागली आणि तो तब्बल 3 वर्षानंतर ताफ्यात परतला आहे.
मुंबई इंडियन्सने उघडली तिजोरी
मुंबई इंडियन्स नेहमीच आयपीएल लिलावात स्वतःच्या रणनीतीने येतात आणि त्यात डगमगत नाहीत. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबईने किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर जोरदार बोली लावली आणि शेवटी त्याला 12 कोटी 50 लाख रुपयांना विकत घेतले.
⚠𝐑𝐄𝐔𝐍𝐈𝐓𝐄𝐃⚠#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/fPtS9P7piI
— Mumbai Indians (@mipaltan) November 24, 2024
खरंतर, इतर संघांनीही बोल्टसाठी बोली लावली होती, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या नावांचाही समावेश होता. ट्रेंट बोल्ट याआधीही मुंबई इंडियन्सचा भाग राहिला आहे. 2020 मध्ये तो मुंबईला गेला आणि 2 वर्षे त्याच टीममध्ये राहिला.
मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. फ्रँचायझीने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला लिलावातून विकत घेतले आहे. म्हणजेच पुन्हा एकदा बुमराह आणि बोल्टची जोडी मैदानात कहर करताना दिसतील.
⚡𝕏💥
— Mumbai Indians (@mipaltan) November 24, 2024
#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/qVI62gZtBq
ट्रेंट बोल्टचे आयपीएल रेकॉर्ड
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आयपीएलमध्ये 103 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 26.69 च्या सरासरीने 121 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने 8.29 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट रोहित शर्माच्या शत्रू
ट्रेंट बोल्ट हा एक असा गोलंदाज आहे ज्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचा दिग्गज रोहित शर्माला खूप त्रास दिला आहे. एकप्रकारे मुंबईने रोहित शर्माचा सर्वात मोठा शत्रू आपल्या संघात सामील केला आहे. ट्रेंट बोल्ट याआधी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा फ्रँचायझीमध्ये परतला आहे.
हे ही वाचा -